एक्स्प्लोर

Nashik Drug Case : तो आला, तो थांबला, सगळी गणितं जुळवून गेला, ललित पाटीलविषयी नाशिक पोलिसांना थांगपत्ताच नाही, कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह

Nashik Lalit Patil : ड्रग्स माफिया ललित पाटील नाशिकमध्ये एकदा नाही तर दोन वेळा येतो, हे तपास उघडकीस आले, तरीही याबाबत नाशिक पोलिसांना खबर नाही.

नाशिक : मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) अटकेत असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील (lalit Patil) ससून हॉस्पिटलमधून पसार झाल्यानंतर नाशिकमध्ये आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. नाशिकमध्ये एकदा नाही तर दोन वेळा येतो, हे तपास उघडकीस आले. तरीही याबाबत नाशिक पोलिसांना खबर नाही. पोलीस मागावर असतानाही नाशिक पोलिसांना (Nashik police) याबाबत काहीच कल्पना नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात असून नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

राज्यभर ड्रग्जचे जाळे (Nashik Drug Racket) पसरविणारा कुख्यात ड्रग माफिया ललित पाटील, भूषण पाटील (Bhushan Patil) आणि त्याचा साथींदार अभिषेक बलकवडे हे तिघे नाशिकचे. नाशिकमध्ये त्यांनी ड्रग्सचा कारखाना सुरु केला होता. मात्र नाशिक पोलिसांना त्याची कल्पनाच नाही, पुण्यातून फरार झालेला आरोपी पुन्हा नाशिकमध्ये एकदा नाही तर दोन वेळा येतो, हे तपास उघडकीस आले. तरीही याबात नाशिक पोलिसांना खबर नाही. नाशिकमध्ये आल्यानंतर तो कोणाच्या संपर्कात होता? कुठे राहिला? त्याला कोणी कोणी मदत केली आहे? हे सगळे प्रश्न अनुत्तरीत आहेत. याबाबत नाशिक पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करतोय? क्राईम ब्रँचच्या तीन टीम असतानाही  नाशिक पोलिसांना याची माहिती का मिळाली नाही? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 

नाशिक पोलिसांच्या अपयशाची केवळ एवढेच उदाहरण नाहीत तर नाशिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरात गुन्हेगारी किती मोठ्या प्रमाणात सुरु आहे, हे वेळोवेळी उघडकीस आले आहे. शहरात बिनदिक्कतपणे ड्रग्सचे रॅकेट सक्रिय आहे. शाळा, महाविद्यालय बाहेर ड्रग्स विकले जात आहेत. शालेय विद्यार्थी  नशेच्या आहारी जात आहेत, तरीही पोलिसांना खबर नाही. लोकप्रतिनिधींकडून वारंवार पोलिसांना सूचना केल्या जातात, मात्र त्याचा पाठपुरावा केला जात नसल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी थेट पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीतच मांडली होती.

नाशिक पोलिसांवर प्रश्नचिन्ह? 

नाशिक शहरात गेल्या काही दिवसापासून टोळक्याचा धुमाकूळ, धार धार शस्त्राने होणारे वार, हाणामाऱ्या, वाहनाची तोडफोड, जाळपोळ, खुनाचे सत्र सुरु असून त्यावर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना अपयश आले आहे. 2023 या चालू वर्षात आतापर्यत 27 खुनाच्या घटना घडल्या असून जाळपोळ तोडफॊडीच्या 15 ते 16 घटना घडल्या आहेत. तसेच दंगल, हाणामाऱ्या यांच्या 46 घटना घडल्या तर महिलावरील अत्यात्काराच्या 79 प्रकरणाची नोंद करण्यात आली असून चोरी घरफोडीच्या सव्वाशेहून अधिक घटना घडल्या आहेत. दिवसाढवळ्या भर रस्त्यात लाठ्याकाठ्या हत्यारे घेऊन हाणामाऱ्या करणाऱ्या गावगुंडांच्या धुमाकूळामुळे नाशिककर प्रचंड दहशतीत आहेत. त्यातच राज्यभर कुप्रसिद्ध असणारा ड्रग माफिया नाशिकमध्ये येऊनही पोलिसांना त्याची खबर कशी नाही, या संपूर्ण प्रकणाची चौकशी करण्याची मागणी माजी आमदार योगेश घोलप यांनी केली आहे.

तीन जिल्ह्याच्या पोलिसांकडून तपास 

दरम्यान या संदर्भात नाशिक पोलिसांशी संपर्क साधला असता तूर्तास या विषयी बोलण्यास पोलिसांनी नकार दिला आहे. मात्र ही सामूहिक जबाबदरी आहे. नाशिक, मुंबई, पुणे हे तिन्ही महाराष्ट्र पोलिसांचे भाग असून तिघांच्या माध्यमातून तपास सुरु आहे. नाशिकला ललित पाटील कुठे आला? कुणासोबत राहिला हे तपासाअंती स्पष्ट होणार असल्याचा दावा नाशिक पोलिसांनी एबीपी माझाशी बोलताना केला आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

Lalit Patil Nashik : 'मी पळालो नाही तर पळवलं', ललित पाटीलचा गौप्यस्फोट, नाशिकच्या राजकीय नेत्यांच्या काळजाचा ठोका चुकला!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget