Nashik Drug Case : 'आरोपांना भीक घालत नाही, नार्को टेस्ट करा अथवा कोणतीही चौकशी करा', दादा भुसे यांचे स्पष्टीकरण
Nashik News : ड्रग्ज किंवा कुठल्याही प्रकरणात संबंध आलाच तर पदासह राजकारण सोडेन, असा निर्वाणीचा इशारा सुद्धा मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.
![Nashik Drug Case : 'आरोपांना भीक घालत नाही, नार्को टेस्ट करा अथवा कोणतीही चौकशी करा', दादा भुसे यांचे स्पष्टीकरण Nashik latest News will leave politics if there is connection in nashik lalit patil drug case says dada Bhuse maharashtra news Nashik Drug Case : 'आरोपांना भीक घालत नाही, नार्को टेस्ट करा अथवा कोणतीही चौकशी करा', दादा भुसे यांचे स्पष्टीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/13/92cbb7f7072bbe67af875b6a2d82fea11697176877602738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : कोणतीही चौकशी करा, नार्को टेस्ट करा, काही आंतरराष्ट्रीय पातळीवरची चौकशी करायची आहे ते करा. अशा आरोपांना भीक घालत नाही. त्या दिवशी देखील बोललो, आजही बोलतो, माझं उत्तरदायित्व हे जनतेशी असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्टीकरण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहे. तसेच ड्रग्ज किंवा कुठल्याही प्रकरणात संबंध आलाच तर पदासह राजकारण सोडेन, असा निर्वाणीचा इशारा सुद्धा मंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.
ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या गौप्य स्फोटानंतर नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाला वेगळ लागल आहे. ललित पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांनी माध्यमांशी संवाद साधत पुन्हा एकदा दादा भुसे आणि शंभूराज देसाई यांची चौकशीसह नार्को टेस्टची मागणी केली आहे. यावर दादा भुसे यांनी पुन्हा प्रत्युत्तर देत कोणत्याही चौकशीला आणि नार्को टेस्टला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. दादा भुसे यावेळी म्हणाले की, मागील वेळी देखील सुषमा अंधारे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी देखील चौकशी करा, असे सांगितले होते. त्यावेळी त्यांचे समाधान देखील झालं होतं, असं दादा भुसे यावेळी म्हणाले. आता पुन्हा त्यांची काही चौकशीची मागणी असेल, त्याला सामोरे जायची तयारी असल्याचे देखील दादा भुसे यांनी स्पष्ट आहे. कोणतीही चौकशी करा, नार्को टेस्ट करा, काही आंतरराष्ट्रीय पातळीवरची चौकशी करायची आहे ते करा, अस दादा भुसे म्हणाले.
जर सुषमा अंधारे यांचे समाधान झाले आहे तर पुन्हा आरोप का? या प्रश्नावर दादा भुसे म्हणाले की, 'अशा आरोपांना भीक घालत नाही. त्या दिवशी देखील बोललो, आजही बोलतो, माझं उत्तरदायित्व हे जनतेशी असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाणार असल्याचे स्पष्टीकरण भुसे यांनी दिले आहे. तर दुसरीकडे ललित पाटीलच्या अटकेनंतर रुग्णालयात नेत असताना ललित पाटील म्हणाला की, 'मी पत्रकारांशी बोलेल आणि यामागे कुणाकुणाचा हात आहे, हे सगळं सांगणार' असल्याचे देखील तो म्हणाला. यावर दादा भुसे म्हणाले की, चौकशीतून या सगळ्या गोष्टी समोर येतील, ड्रग्ज प्रकरण नाहीच तर अशा कुठल्याही प्रकरणात संबंध आलाच तर हे पद आणि राजकारण सुद्धा सोडण्याची तयारी असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे.
प्रसिद्धी मिळवण्यासाठी बेछूट आरोप
तर सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर देताना दादा भुसे म्हणाले की प्रसिद्धी मिळवण्यासाठी बेछूट आरोप केले जात आहेत. वारंवार असं घडणं योग्य नसल्याचा देखील दादा भुसे म्हणाले येणाऱ्या काळामध्ये कायद्याच्या चौकटीत राहून काम करणे आवश्यक आहे. यांच्या पाठीमागे बोलवता धनी कोणी आहे का? त्यांची पण नार्को टेस्ट करावी लागेल, असा खळबळजनक आरोप दादा भुसे यांनी ठाकरे गटावर केला आहे. माझी पहिली नार्को टेस्ट करावी, नंतर त्यांची करावी, अशी मागणी सुद्धा दादा भुसे यांनी केली आहे.
इतर महत्वाची बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)