(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकमध्ये पोलीस बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांचा कावडीवर मनसोक्त ठेका; देहभान विसरून बाप्पाला भावपूर्ण निरोप
Nashik Ganesh Visarjan : उद्या बंदोबस्त असल्याने नाशिकच्या पंचवटी पोलिसांकडून आजच भर पावसात बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला गेला आहे.
नाशिक : अनंत चतुर्दशी (Ganesh Chaturthi) उद्या जरी असली तरी मात्र नाशिकच्या पंचवटी पोलिसांकडून (Panchavti Police) आजच भर पावसात बाप्पाला वाजत गाजत निरोप दिला गेला आहे. गेले नऊ दिवस पोलीस बंदोबस्तात होते आणि उद्या तर विसर्जन मिरवणूकीचा महत्वाचा दिवस असल्याने डोळ्यात तेल घालून पोलिसांना काम करावं लागणार असल्याने आजच पोलिसांनी आपल्या बाप्पाचे विसर्जन केले आहे. गणेश बाप्पाच्या (Ganesh Visarjan) या मिरवणुकीत नाशिक पोलिसांनी ठेका धरत मनसोक्त डान्स केल्याचे पाहायला मिळाले.
अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह शिगेला पोहचला असून उद्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल. नाशिकमध्ये (Nashik) देखील उद्या, गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून मुख्य मिरवणुकीला सुरुवात होणार असून गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या मिरवणुकीत बंदोबस्त असल्याने आजच अनेक ठिकाणीच्या पोलीस स्टेशनच्या (Police Bappa) बाप्पाना निरोप देण्यात आला आहे. यावेळी पोलीस ठाण्यातील सर्वच पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी नाचण्याचा आनंद घेतल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अगदी सहाय्यक पोलीस आयुक्तांपासून ते पोलीस शिपायापर्यंत साऱ्यांनीच फेटा आणि पारंपरिक वेशात आपल्या कामाचा ताण तणाव विसरत नाशिक कावडीवर मनसोक्त ठेका धरल्याचं यावेळी बघायला मिळाले. एका महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा नृत्याने तर सगळ्यांचेच लक्ष वेधले होते.
अवघ्या काही तासांवर लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे उद्याची मिरवणूक शातंतेत पार पडावी यासाठी पोलिसांकडून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सकाळी अकरा वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत ही मिरवणूक सुरु राहणार असल्यानें पोलिसांवर मोठा ताण येणार आहे. त्यामुळे आजच अनेक पोलीस ठाण्यातील लाडक्या गणरायाला वाजत गाजत निरोप देण्यात आला. यावेळी नाशिकमधील पंचवटी पोलिसांनी आज भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी मिरवणुकीत पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सहभागी होत मिरवणुकीचा आनंद द्विगुणित केला. यावेळी सहभागी पोलिसांना आपला डान्स करण्याचा मोह आवरला नाही. अखेरच्या मूर्तीचं विसर्जन पार पडल्यानंतर पोलिसांनी मिरवणुकीमध्ये ठेका धरला.
पोलिसांनी गणवेशात असताना ठेका धरू नये
राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असून उद्या गणेशाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाणार आहे. यासाठी पोलिसांचा जबरदस्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालकांनी राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांना खबरदार केले आहे. सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. या उत्सवी माहोलमध्ये डिजेचा ताल भल्याभल्यांना नाचायला भाग पाडतो. त्यास पोलीस कसे अपवाद ठरणार म्हणून पोलिसांनी गणवेशात असताना ठेका धरू नये, खाकीचे भान ठेवावे, बेधुंद होत पोलीस नाचत असल्याचे व्हिडिओ नेहमी पाहण्यात येतात. या अनुषंगाने तंबी देण्यात आली आहे. म्हणून गणवेशात नाचत असल्याचे व्हिडीओ व्हायरल करण्यास मनाई करण्याचे पत्रक काढण्यात आले आहे.
इतर महत्वाची बातमी :