(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Ganesh Visarjan : नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीवर ड्रोनची नजर, 70 सीसीटीव्ही कॅमेरे, असा आहे मिरवणूक मार्ग?
Nashik Ganesh Visarjan : नाशिकच्या (Nashik) गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी (Ganesh Visarjan) सार्वजनिक मंडळासह महापालिका, पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
नाशिक : नाशिकच्या (Nashik) गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी (Ganesh Visarjan) सार्वजनिक मंडळासह महापालिका, पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मनाच्या गणपतींसह सर्वच मंडळांचा विसर्जन मिरवणुकीचा क्रम ठरला असून या मिरवणुकीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यासाठी मिरवणूक मार्गावर जवळपास 70 कॅमेरे लावण्यात आले आहेत, तर चार ड्रोनद्वारे मिरवणूक मार्गावर (Ganesh Visarjan MIrvanuk) पोलीस लक्ष ठेवून असणार आहे.
अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह शिगेला पोहचला असून उद्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल. नाशिकमध्ये (Nashik) देखील उद्या सकाळी अकरा वाजेपासून मुख्य मिरवणुकीला सुरवात होणार असून गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या बंदोबस्तासह यंदा तब्बल 70 सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) मिरवणूक मार्गावर पाळत ठेवणार आहेत. त्याचबरोबर चार ड्रोनद्वारे अवकाशातून नाशिक गणेश मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवले जाणार आहे. यासह प्रत्येक मंडळांसोबत एक वरिष्ठ अधिकारी व पथक नेमण्यात आले असून हे पथक मंडळांच्या वेळेसंदर्भात नोंदी घेणार आहे. त्यामुळे कुठल्याही अनुचित प्रकाराला आळा बसणार आहे.
गणेश विसर्जन मिरवणूक (Nashik Ganesh Visarjan) अवघ्या काही तासांवर आली असून नाशिकमध्ये सकाळी अकरा वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. शहरातील भद्रकाली परिसरातील वाकडी बारव येथून सुरुवात होणार आहे. त्यासाठी पोलिस उपायुक्त परिमंडळ एकच्या कार्यालयाने बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण केले आहे. तसेच रेंगाळणाऱ्या मंडळांवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणुकीच्या सुरुवातीपासून 'ड्रोन शूटिंग' करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी केलेल्या चुका, इतर पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. त्यात पोलिसांचे निरीक्षणही कागदोपत्री मांडण्यात येतील. यासह एखाद्या मंडळाने नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्यावरील कारवाईचा निर्णयही घेण्यात येणार आहे.
असा आहे मिरवणूक मार्ग
दरम्यान पारंपरीक मिरवणूक मार्गावरील वाकडी बारव, चौकमंडई, जहांगिर मशीद, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, विजयानंद थिएटर, गाडगे महाराज पुतळा, गो. ह. देशपांडे पथ, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालविय चौक, परशुरामपुरीयारोड, कपालेश्वर मंदिर, भाजीबाजार, म्हसोबा पटांगण अशी निघणार आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.
इतर महत्वाची बातमी :