(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Drug Case : 'गिरणा नदी चर्चेत, असंख्य गावांना पाणी पुरवठा ते सुसाइड पॉईंट आणि आता नाशिकच्या ड्रग्ज रॅकेटशी कनेक्शन'!
Nashik News : नाशिकच्या ड्रग्ज रॅकेटशी कनेक्शन आढळून आलेले देवळा तालुक्यातील गिरणा नदीपात्र अनेक कारणांसाठी चर्चेत असते.
नाशिक : ड्रग्स माफिया ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघ याने कारवाईच्या भीतीने गिरणा नदीपात्रात ड्रग्स फेकून दिल्यानं खळबळ उडाली आहे. गिरणा नदीतून बारागाव पाणी पुरवठा योजनासह अनेक गावांना नदीच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. नदीत फेकून देण्यात आलेले ड्रग्स एका प्लस्टिकच्या गोणीत बंदिस्त होते, मात्र नदीच्या पाण्याच्या तुलनेत त्याचे प्रमाण कमी असल्याने त्याचा दुष्परिणाम जाणवला नाही. मात्र असा प्रकार घडू नयेसाठी ताबडतोब उउपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
गिरणा नदी नाशिकची महत्वपूर्ण नदी असून याच नदीतून आजुबाजुंच्या असंख्य गावांना पाणीपुरवठा केला जातो. गिरणा नदीचे पात्र विस्तीर्ण असल्याने देवळा तालुक्याची भिस्त या नदीवर असते. मात्र अलीकडे या नदीपुलावरून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचबरोबर येणारे जाणारे देखील कचरा नदीत टाकत असल्याची तक्रार स्थानिंकाकडून करण्यात आले आहे. अशातच नाशिक ड्रग्ज प्रकरणात गिरणा नदीचे नाव आल्याने स्थानिकांना धक्का बसला आहे. नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणातील ललित पाटील याचा ड्रायव्हर सचिन वाघ याने गिरणा नदीपात्रात कोट्यवधींचा ड्रग्ज फेकून दिल्याचे समोर आले आहे. हा सचिन वाघ याच देवळा तालुक्यातील असल्याने त्याने हे सर्व प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांच्या कारवाईच्या धाकाने गिरणा नदीपात्रात ड्रग्ज फेकून दिले.
नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावादरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रातील ड्रग्जचा मोठा साठा मुंबई पोलिसांना आढळून आला आहे. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघ याने नाशिक कारखानामध्ये बनविलेले ड्रग्ज नष्ट करण्याच्या हेतून गिरणा नदीपात्रात फेकून दिले होते. त्यानुसार मध्यरात्री अडीच वाजल्यापासून ही शोध मोहीम सुरू झालेली आहे, अद्यापही शोध मोहीम सुरूच आहे. साकीनाका पोलिसांच्या पथक घटनास्थळी तळ ठोकून असून संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली आहे. ड्रग्ज नष्ट करण्याच्या हेतूने गिरणा नदी पात्रात फेकून देण्यात आल्याचं समोर आल आहे. एक वाडीच्या आसपास 15 किलो ड्रग्स लपून ठेवल्याचे देखील समोर आला असून ते पोलिसांनी हस्तगत केला आहे. नदीपात्रातील ड्रग हे शोधण्याचे काम सुरू असून यासाठी नदीपात्रात कॅमेरे सोडण्यात आले आहेत.
ऑक्सिजन संपल्यान सर्च ऑपरेशन थांबवलं!
दरम्यान गिरणा नदीपात्रात सुरु असलेले सर्च ऑपरेशन थांबविण्यात आले असून स्कुबा डायव्हिंग पथकाचा ऑक्सिजन संपल्यान सर्च ऑपरेशन थांबविले आहे. काल मध्यरात्रीपासून हि सर्च मोहीम सुरु असून आतापर्यंत ड्रग्जच्या गोण्या सापडल्या असल्याचे समोर आलं आहे. रात्रीपासून स्कुबा डायव्हिंग पथकाच्या माध्यमातून सर्च ऑपरेशन सुरु असल्याने आता काही वेळापूर्वी ऑक्सिजन संपल्याने काही वेळासाठी सर्च मोहीम थांबविण्यात आली आहे. सुमारे 50 किलो ड्रग्स नदी पात्रात फेकल्याच सचिन वाघने पोलिसांना तपासादरम्यान सांगितल्याची माहिती आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून ड्रग्सचा शोध घेण्यात आला, मात्र पाणी साधारण 15 ते 20 फूट खोल असल्यानं ड्रग्सचा साठा अद्याप बाहेर काढण्याच काम सुरू आहे. तर जवळच असणाऱ्या सरस्वतीवाडी भागातून 15 किलो एमडी ड्रग्स हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
स्थानिकांकडून उपाययोजना करण्याची मागणी
दरम्यान नदीपात्रातून किती ड्रग्स बाहेर काढण्यात येत आहे हे अद्याप समजू शकले नाही, मात्र काही गोण्या बाहेर काढण्यात येत आहे. त्यानुसार साधारण 50 किलोच्या आसपास ड्रग्स असण्याची शक्यता असून आजच्या बाजारभावानुसार ते शंभर कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे त्यामुळे सदर ठिकाणी नाशिक पोलिसांचं देवळा पोलिसांचे पथक देखील शोध मोहिमेत सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान गिरणा हे नदीपात्र प्रदूषणाच्या गर्तेत अडकले आहे, नदीपात्रात कचरा टाकणे किंवा आत्महत्या करण्याचं प्रमाण ही जास्त असल्याने सुसाईड पॉईंट म्हणून हे ठिकाण ओळखले जात असल्याची स्थानिकांनी खंत व्यक्त केली आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी आणि ड्रग्स फेकण्यासारखे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी पुलांच्या दोन्ही बाजूला संरक्षण भिंत किंवा जाळी बांधावी अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
इतर महत्वाची बातमी :