एक्स्प्लोर

Nashik News : धक्कादायक! आजोबाच्या कुशीत नातू गाढ झोपलेला, पण मध्यरात्री भयंकर घडलं अन् होत्याच नव्हतं झालं

Nashik Rain : नाशिकच्या (Nashik) दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा गावात रात्री बारा वाजेच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे.

नाशिक : अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पावसाने (Nashik Rain) दमदार एन्ट्री केली आहे. नाशिकसह जिल्हाभरात पावसाने सुरुवात केली आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वदूर असलेल्या पावसाने शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरले. मात्र दिंडोरी तालुक्यात (Dindori) हृदययद्रावक घटना समोर आली आहे. पावसामुळे एका जुन्या कंपनीच्या खोलीचा काही भाग घरावर कोसळून आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील नळवाडपाडा येथे घडली आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासुन दडी मारलेल्या पावसाने (Nashik Rain Update) अखेर नाशिकरांवर आभाळमाया केली. नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाने जोरदार कमबॅक केले आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला आहे. काल रात्रीपासून वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या पावसात एका जुन्या कंपनीच्या खोलीचा काही भाग घरावर कोसळून आजोबा आणि नातवाचा मृत्यू (Death) झाला. दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा गावात रात्री बारा वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. आजी, आजोबा आणि नातू घरात झोपलेले असताना प्रकार घडला. यात आजीबाईंना सुखरूप बाहेर काढण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. 

गुरुवारी पहाटे पासून दिंडोरी तालुक्यात पाऊस सुरू असून नळवाडपाडा शिवारातील इंडो फ्रेंच कंपनीच्या जुन्या काही खोल्या आहेत. त्या शेजारी गुलाब वामन खरे यांचे घर आहे. खरे हे रात्री नेहमी सदर खोलीत पत्नी विठाबाई गुलाब खरे, नातू निशांत विशाल खरे यांच्या समवेत राहत होते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिघे झोपलेले असताना अचानक सदर खोलीचे छत कोसळल्याने त्याखाली ते दाबले गेले. (Slab Collapsed) शेजारी त्यांच्या मुलाला आवाज येताच त्यांनी तिथे बघितले असता त्यांना आई वडील मुलगा छताखाली दाबल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने सरपंच हिरामण गावित आणि ग्रामस्थांना कळवले. सरपंच यांनी तातडीने सर्कल तलाठी यांना कळवत मदत मागवली.

यानंतर काही वेळात जेसीबी साहाय्याने तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पहाटे चारच्या सुमारास सरपंच हिरामण गावित, शिपाई बाळू गवळी आणि ग्रामस्थांनी आत जात तिघांना बाहेर काढले. त्यात आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला होता, तर जखमी आजी विठाबाई यांना सुखरूप बाहेर काढत त्यांना दवाखान्यात नेले. सर्कल अमोल ढमके, तलाठी गिरीश बोंबले, ग्रामसेविका ललिता खांडवी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सदर कुटुंबाला मदत मिळवूनदेण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

Nashik Rain : दिलासा! नाशिकसह जिल्ह्यात पावसाचे दमदार कमबॅक, रात्रीपासून जोरदार, शेतीपिकांना जीवदान 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी
घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी
Ashok Kharat Nashik Crime: अशोक खरातचं डोकं दुखायचं थांबेना, पेनकिलरचाही फायदा नाही, वकिलांची कोर्टात महत्त्वाची मागणी
अशोक खरातचं डोकं दुखायचं थांबेना, पेनकिलरचाही फायदा नाही, वकिलांची कोर्टात महत्त्वाची मागणी
Ashok Kharat Court Hearing: अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, पाचव्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, पाचव्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ अन् हातात बांधलेला दोरा काढला, मानेवर लव्ह बाईट, नाशिकमधील आणखी एक हादरवणारी कहाणी
तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ अन् हातात बांधलेला दोरा काढला, मानेवर लव्ह बाईट, नाशिकमधील आणखी एक हादरवणारी कहाणी

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget