एक्स्प्लोर
तलासरी, डहाणूत पुन्हा भूकंपाचा जोरदार धक्का, घर कोसळून एकाचा मृत्यू, धक्क्यांची तीव्रता वाढल्याने नागरिक भयभीत
हाणू, तलासरी परिसरात आतापर्यंत 2.5 ते आणि 4.8 रिश्टर स्केल पर्यंत भूकंपाच्या एकूण 35 नोंदी हवामान विभागाकडून नोंदविण्यात आल्या आहेत.असे एकूण 35 भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत शेकडो सौम्य धक्के बसले आहेत.
पालघर : पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी परिसरात भूकंपाचे सत्र सुरूच असून बुधवारी रात्री पुन्हा परिसरातील गावे भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरली आहेत. त्यात नागझरी बोंडपाडा येथील रिश्या दामा मेघवाले ( 55) यांच्या अंगावर घर कोसळून त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांचे घर कौलारू आणि कुडाच्या भिंती होत्या. त्या घरात रिश्या व त्यांची पत्नी झोपले असताना रात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास भूकंपाचा जोरदार धक्का बसल्याने घर कोसळले. त्यात दबल्याने रिश्या यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी किरकोळ जखमी झाली आहे.
त्यामुळे रिश्या मेघावले यांच्या मृत्यूने भूकंपाचा दुसरा बळी पडला आहे. यापूर्वी 2 वर्षीय भूकंपाचा आवाजाने घाबरून पळणाऱ्या वैभवी भुयाळ नावाचा चिमुकलीचा बळी गेला होता. तसेच दापचरी वसाहत येथील एका घराच्या भिंतीचा काही भाग कोसळून पडला असून या घटनेत धुंदलवाडी येथील हृतिका डगला या मुलीच्या घरात असतांना पायावर वीट पडून जखमी झाली होती. तर काही घरांना पूर्वीपेक्षा मोठे तडा गेल्याचेही नागरिकांनी सांगितले आहे. धुंदलवाडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या आश्रम शाळेच्या 9 वीच्या वर्गाच्या भिंतीच्या विटा पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वीही याच आश्रम शाळेच्या एका वर्गाची भिंत देखील कोसळली होती.
डहाणू, तलासरी तालुक्यात गुरुवारी सकाळी ७ वाजेपर्यंत एकापाठोपाठ भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बुधवारी मध्यरात्रीपासून ते गुरुवार सकाळपर्यंत जवळजवळ 8 ते 10 सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले. रात्री 1 वाजून 3 मिनिटे ते 1 वाजून 18 मिनिटाच्या दरम्यान चार मोठे धक्के जाणवले. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार रात्री 1 वाजून 3 मिनिटाच्या भूकंपाची नोंद 4.8 रिश्टर स्केल तर 1 वाजून 15 मिनिटाला 3.6 रिश्टर स्केल इतकी करण्यात आली आहे. 1 वाजून 3 मिनिटाला लागलेला 4.8 हा आजपर्यंतचा सर्वात मोठा धक्का ठरला आहे.
डहाणू आणि तलासरी तालुक्यात नोव्हेंबर महिन्यापासून भूकंपाचे सत्र सुरू आहे. डहाणू, तलासरी परिसरात आतापर्यंत 2.5 ते आणि 4.8 रिश्टर स्केल पर्यंत भूकंपाच्या एकूण 35 नोंदी हवामान विभागाकडून नोंदविण्यात आल्या आहेत.असे एकूण 35 भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत शेकडो सौम्य धक्के बसले आहेत.
भूकंपाचा आतापर्यंतचा घटनाक्रम :-
11 नोव्हेंबर - 3.2 रिश्टर स्केल
24 नोव्हेंबर - 3.3 रिश्टर स्केल,
1 डिसेंबर - 3.1 व 2.9 रिश्टर स्केल
4 डिसेंबर- 3.2 रिश्टर स्केल
7 डिसेंबर- 2.9 रिश्टर स्केल
10 डिसेंबर- 2.8 व 2.7 रिश्टर स्केल
20 जानेवारी- 3.6 रिश्टर स्केल
24 जानेवारी- 3.4 रिश्टर स्केल
1फेब्रुवारी- 3.3,3.5,3.0,4.1,3.6,3.5 रिश्टर स्केल
7 फेब्रुवारी- 3.3 रिश्टर स्केल
13 फेब्रुवारी- 3.1 रिश्टर स्केल
20 फेब्रुवारी- 2.9, 2.9, 3.1 रिश्टर स्केल
1 मार्च- 3.2, 4.3 रिश्टर स्केल
9 मार्च - 2.8 रिश्टर स्केल
10 मार्च - 3.5 रिश्टर स्केल
31 मार्च- 3.2 रिश्टर स्केल
2 एप्रिल - 3.0 , 2.9 रिश्टर स्केल
9 एप्रिल- 3.0 रिश्टर स्केल
15 एप्रिल - 3.4 रिश्टर स्केल
12 मे रोजी- 2.6 रिश्टर स्केल
10 जुलै रोजी- 2.6 रिश्टर स्केल
20 जुलै रोजी- 3.5 रिश्टर स्केल
25 जुलै रोजी- 4.8, 3.6 रिश्टर स्केल
9 महिन्यापासून पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र एकापाठोपाठ एक सुरू आहे. मागील काही महिने झालेले भूकंप पाहता काही क्षणासाठी हादरे बसत होते. मात्र जुलै महिन्यात बसत असलेले भूकंपाचे धक्के समुद्री लाटेप्रमाणे काही वेळ राहत असल्याने धोका अधिक वाढू लागला आहे. जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा व एनडीआरएफ मार्फत भूकंपप्रवण क्षेत्रात तंबू व ताडपत्री टाकून मांडव घातले होते. मात्र तेही मागील महिन्यात काढून नेण्यात आले असल्याने वरून कोसळणारा पाऊस तर खालून भूगर्भातून होणारा धरणीकंप यामुळे स्थानिक नागरिकांनी जावे तरी कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधित बातम्या
पालघर भूकंप : तात्पुरत्या निवासासाठी घराजवळ लहान तंबू उभारण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
पालघर भूकंप : एनडीआरएफची पथकं मदतीसाठी दाखल
पालघर भूकंप : वसतिगृहातील विद्यार्थी रस्त्यावर
पालघर भूकंप : एनडीआरएफची दोन पथकं पोहोचली, नागरिकांमध्ये जनजागृती करणार
पालघर भूकंप : आरोग्य विभागासह एनडीआरएफला पाचारण
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement