Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टरखाली सापडून सहा वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी अंत; वडील जखमी
Nashik Ganesh Visarjan : वडिलांसोबत गणेश विसर्जन मिरवणूक (Ganesh Visarjan) पाहण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
नाशिक : नाशिक शहरातील अंबड भागात गणेश विसर्जन मिरवणूक (Ganesh Visarjan) पाहण्यासाठी गेलेल्या रुद्रा राजू भगत या सहा वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याचबरोबर त्याचसोबत असलेले त्याचे वडीलही जखमी झाले. नाशिक शहरातील अंबड भागातील चुंचाळे परिसरात सहा वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
अंबड औद्योगिक वसाहतीत (Ambad MIDC) चुंचाळे शिवार पोलिस चौकीच्या हद्दीत चुंचाळे गाव भागात ट्रॅक्टरवर गणेश विसर्जन मिरवणूक सुरु होती. यावेळी रात्री 10 वाजेच्या सुमारास येथील कृष्णा स्विट्सकडून दातीर नगर भागाकडे जाणाऱ्या उतार रस्त्यावर ट्रक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत मिरवणुक पाहणाऱ्या गणेश भक्तांवर जाऊन ट्रक्टर धडकला. यात रुद्रा राजू भगत हा सहा वर्षीय मुलगा ठार झाला. तर त्याचे वडील राजू भगत हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबड चुंचाळे पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. एकीकडे लहान मुलांना विसर्जन मिरवणूक घेऊन गेलेल्या वडिलांच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दुसरीकडे, नाशिकमध्ये (Nashik) आज सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. रात्री एक वाजेपर्यंत नाशिक शहरात मिरवणूका सुरु होत्या. त्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार मिरवणुका बंद झाल्या. मात्र याच सुमारास गणेश विसर्जना दरम्यान अनेक अनुचित प्रकार समोर आले. साडे आठ वाजेच्या सुमारास गंगा घाटावर दोन तरुण (Youth Drowned) बुडाल्याची घटना घडली. त्याचवेळी वालदेवी धरण परिसरात दोन तरुण गणेश विसर्जन बुडाल्याचे समोर आले. अशातच
जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू
दुसरीकडे, नाशिक शहरातील गणेश विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. मात्र गणेश विसर्जनादरम्यान शहर परिसरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात साडे आठ वाजेच्या सुमारास गोदा घाटावर दोन गणेश भक्त बुडाले होते. त्यांचा शोध अद्यापही सुरु आहे. तर दुसरीकडे वडनेर दुमाला येथील वालदेवी नदीपात्रामध्ये एकजण गणपती विसर्जन दरम्यान पाण्यात बुडाला होता. त्यानंतर त्याला वाचण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज सकाळी त्याचा मृतदेह सापडला आहे. तर चेहडी येथील संगमेश्वर नदीपात्रात सिन्नर फाटा परिसरात राहणाऱ्या दोघांचा गणेश विसर्जन करत असताना बुडून मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा त्याचा शोध घेऊन नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर रात्री दहा वाजेच्या सुमारास अंबड परिसरात ट्रॅक्टरखाली सापडून सहा वर्षीय मुलाचा नाहक बळी गेला आहे.
इतर महत्वाची बातमी :