एक्स्प्लोर

Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट; तीन घटनांमध्ये पाचजणांचा बु़डून मृत्यू

Ganesh Visarjan : नाशिकमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये प्रत्येकी दोनजण गणेश विसर्जना दरम्यान बुडाले असल्याची घटना समोर आली आहे.

नाशिक : अनंत चतुर्दशीच्या पूर्व संध्येला नाशिक जिल्ह्यातील निफाडमध्ये गणेश विसर्जनावेळी युवक बुडाल्याची घटना घडली होती. त्यातच आज नाशिक मधील गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे. तीन वेगवेगळ्या घटनेत पाच जण बुडाले  आहेत. चेहेडी संगमेश्वर परिसरात महाविद्यालयीत तरुण बुडाला आहे. दरम्यान पंचवटीत गाडगे महाराज पुलाखाली बुडालेल्या दोघांचा शोध अद्यापही सुरूच आहे. आज दिवसभरात वेगवेगळ्या तीन घटनेतील दोघांचे मृतदेह मिळाले असून इतर तिघांचा शोध सुरू आहे. शहरातील गोदावरी नदीत (Godawari river) दोन आणि इगतपुरीतील वालदेवी धरणात दोन गणेशभक्त बुडाल्याची घटना समोर आली आहे.  

नाशिकमध्ये आज सकाळपासून गणेश विसर्जन मिरवणुकीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. जवळपास 22 हुन अधिक मंडळ या मिरवणुकीत सहभागी झालेली आहेत. अशातच गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली आहे. शहरातील रामकुंड परिसरातील गाडगे महाराज पुलाजवळील घाटावर दोन गणेश भक्त बुडाल्याची घटना समोर आली आहे. हे गणेश भक्त विसर्जनासाठी दाखल झाले होते. याचवेळी ते दोघेही बुडाल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत या दोघांचाही बचाव पथकाकडून शोध घेतला जात असून बघ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

तर दुसरी घटना इगतपुरी तालुक्यातील वालदेवी धरणात परिसरात घडली आहे. वालदेवी परिसरात मित्रांसोबत गेलेल्या दोन युवकांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दोघांचेही मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले असून पुढील कार्यवाहीसाठी मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत . विशेष म्हणजे यंदा वालदेवी धरण परिसरात विसर्जनासाठी नागरिकांना मज्जाव करण्यात आला होता. तरीदेखील मोठ्या संख्येने गणेश भक्त विसर्जनासाठी दाखल झाले होते आणि अशातच हा अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

नाशिकमधील मिरवणूक मध्यरात्रीपर्यंत जाण्याची शक्यता

नाशिकमधील गणेश विसर्जन मिरवणूक अजूनही सुरू असून अद्याप मिरवणुकीतील मानाचा गणपती असलेल्या महापालिकेचा गणपती थोड्याच वेळात विसर्जनासाठी गोदागाठावर दाखल होणार आहे. त्यामुळे नाशिकमधील गणेश विसर्जन मध्यरात्रीपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. दरम्यान दुपारच्या सुमारास देखील गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन तरुणांची हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यातच सायंकाळच्या सुमारास शहरात दोघे तर जिल्ह्यात दोघे असे चौघेजण बुडाल्याची घटना घडल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले आहे.

इतर संबंधित बातमी :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
Kalyan Dombivli Shivsena and MNS Yuti: कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
Kishori Pednekar Shivsena UBT Group Leader: ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
मोठी बातमी : कल्याण डोंबिवलीत मनसेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा
मोठी बातमी : कल्याण डोंबिवलीत मनसेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा

व्हिडीओ

Anil Galgali On Mumbai Mayor :मुंबई महापौर पदासाठी 114 चा ‘जादुई आकडा’ आवश्यक नाही, वस्तुस्थिती काय?
Mahesh Sawant On Samadhan Sarvankar : भाजपच्या टोळीमुळे पराभव झाल्याचा आरोप करणाऱ्या सरवणकरांना सावंतांनी सुनावलं
Harshwardhan Sapkal Buldhana: प्रतिभा धानोरकर-विजय वडेट्टीवार वादावर हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
Pratibha Dhanorkar On Vijay Wadettiwar : काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर, चंद्रपूरात प्रतिभा धानेकर आणि विजय वडेट्टीवार वाद शिगेला
Gosikhurd Project Special Report गोसेखुर्द काठोकाठ पण 38 वर्षांपासून गावकरी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राहणाऱ्या आदिवासी समाजाला वन विभागाची नोटीस; घरं रिकामं करण्यास सांगण्यात आलं, बस सेवा बंद केल्याचा आरोप
Kalyan Dombivli Shivsena and MNS Yuti: कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचा भाजपला 'मनसे' कात्रजचा घाट; आता काँग्रेस नगरसेवकांच्या निर्णयानं भूवया उंचावल्या
Kishori Pednekar Shivsena UBT Group Leader: ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
ठाकरेंच्या शिवसेनेकडून गटनेतेपदी किशोरी पेडणेकरांची निवड; उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
मोठी बातमी : कल्याण डोंबिवलीत मनसेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा
मोठी बातमी : कल्याण डोंबिवलीत मनसेचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा
Share Market Today: सेन्सेक्स 1 हजार अंकांनी घसरत 81,100 वर पोहोचला, निफ्टी देखील 200 अंकांनी घसरला; 2 दिवसांत तब्बल 2 हजार अंकानी आदळला
सेन्सेक्स 1 हजार अंकांनी घसरत 81,100 वर पोहोचला, निफ्टी देखील 200 अंकांनी घसरला; 2 दिवसांत तब्बल 2 हजार अंकानी आदळला
शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला तारीख पे तारीख सुरुच! आता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला सुनावणी होणार!
BMC Mayor Reservation 2026: मुंबईतील ठाकरेंच्या दोन हुकमी एक्क्यांवर सत्ताधाऱ्यांची नजर; कोण आहेत ते नगरसेवक, नेमकं कारण काय?
मुंबईतील ठाकरेंच्या दोन हुकमी एक्क्यांवर सत्ताधाऱ्यांची नजर; कोण आहेत ते नगरसेवक, नेमकं कारण काय?
जेव्हा पत्नीचा दर्जा तेव्हाच लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये महिला सुरक्षित, पुरुष मॉडर्न होऊन नातं ठेवतात अन् तुटल्यावर चारित्र्याकडे बोट करतात; हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
जेव्हा पत्नीचा दर्जा तेव्हाच लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये महिला सुरक्षित, पुरुष मॉडर्न होऊन नातं ठेवतात अन् तुटल्यावर चारित्र्याकडे बोट करतात; हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी
Embed widget