नाशिक हादरलं! एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या, बाप-लेकांनी संपवलं जीवन
Marathi News Update : एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे.
Nashik Latest Marathi News Update : एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. बाप-लेकांनी वेगवेगळ्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. आत्महत्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास करत आहेत. पण या धक्कादायक प्रकरामुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
नाशिकमधील सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगरमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केली. वडील आणि दोन मुलांनी वेगवेगळ्या खोलीत फॅनला गळफास घेऊन जीवन संपवलं. वडील दीपक शिरोडे यांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी आणि दोन मुलांनी वेगवेगळ्या खोलीमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाच्या शेजाऱ्यांकडे पोलीस चौकशी करत आहेत.
आणखी वाचा :