डॉक्टर पत्नीच्या अपघाताचा रचला बनाव, भावाच्या तक्रारीमुळे सत्य समोर, पतीनंच डोक्यात दगड घालून संपवल्याचा आरोप
Nashik Crime: काही दिवसांपूर्वी नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथीलच वडिलांच्या त्रासाला कंटाळून आई आणि मुलाने मिळून खून केल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Nashik Crime News: नाशिकच्या (Nashik News) नांदगाव तालुक्यात (Nandgaon Taluka) विहाहितेचा अपघाताचा बनाव रचत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पत्नीनं माहेरून घर आणि दवाखाना बांधण्यासाठी 25 लाख रुपये आणले नाही, या कारणावरुनच विवाहितेची हत्या झाल्याचा आरोप मयत महिलेच्या भावानं केला आहे.
विवाहितेच्या भावानं याप्रकरणी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. भावानं केलेल्या तक्रारीवरुन नांदगाव पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भावानं केलेल्या तक्रारीनंतरच या प्रकरणाची उकल झाल्याचं बोललं जात आहे.
काही दिवसांपूर्वी नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथीलच वडिलांच्या त्रासाला कंटाळून आई आणि मुलानं मिळून हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता नाशिक हादरवणारी घटना घडली आहे. नाशिकमधील डॉक्टर महिलेच्या हत्येनं परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रकरण नेमकं काय?
डॉ. भाग्यश्री शेवाळे असं मृत विवाहितेचं नाव आहे. गेल्या 27 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा ते रात्री अकरा वाजेदरम्यान मन्याड फाटा परिसरात दुचाकी अपघातात न्यायडोंगरी येथील डॉ. भाग्यश्री शेवाळे यांचा मृत्यू झाल्याची नोंद चाळीसगाव पोलिसांत करण्यात आली होती. घटनास्थळ नांदगाव पोलिसांच्या हद्दीत येत असल्यानं सदर गुन्हा नांदगाव पोलिसांत वर्ग करण्यात आला होता. पण घटनेला 15 दिवस उलटले आणि या प्रकरणानं वेगळं वळण घेतलं.
घटनेच्या 15 दिवसांनंतर मृत डॉ. भाग्यश्री यांचा छत्रपती संभाजीनगर मध्ये वास्तव्यास असलेला भाऊ सचिन कैलास साळुंखे यांनं फिर्याद दाखल केली. त्यानुसार त्याची बहीण भाग्यश्रीकडे तिचे पती डॉ. किशोर शेवाळे आणि सासरे नंदू शेवाळे हे माहेरून घर आणि दवाखाना बांधण्यासाठी 25 लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी सातत्यानं करत होते. भाग्यश्रीकडून मागणी पूर्ण न झाल्यानं डॉ. किशोर शेवाळे आणि नंदू शेवाळे यांनी भाग्यश्री यांचा दगडाने ठेचून आणि काचेची बाटली मारून खून केल्याचा आरोप या फिर्यादीत करण्यात आला आहे. या फिर्यादीनुसार, नांदगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :