एक्स्प्लोर

मोठी बातमी: नाशिकच्या द्वारका पूल अपघाताबाबत महत्त्वाची अपडेट, मृतांचा आकडा वाढला, लोखंडी सळईंचा पुरवठादारही गोत्यात

Nashik Accident Update: नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात मृतांचा आकडा वाढला आहे.

Nashik Accident Update: नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात ट्रकमधील लोखंडी सळ्या अंगात घुसून 5 जण जागीच ठार तर  13 जण गंभीर जखमी झाले होते. आता या अपघातात मृतांची संख्या वाढली असून जखमींचा रुग्णालयात मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 7 वर पोहेाचली आहे. लोखंडी सळ्यांची एवढ्या धोकादायकपणे वाहतूक करणारा पुरवठादार गोत्यात आला असून या भीषण अपघाताला कारणीभूत ठरणारा टेम्पो चालक, मालक आणि सळईचा पुरवठादार अशा तिघांविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील दोघांना अटक झाली असून टेम्पोचालक फरार आहे.

नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात रविवारी रात्री भीषण (Nashik Accident News) अपघात झाला. एक पिकअप ट्रक लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकवर जाऊन आदळला. यानंतर मागून येणाऱ्या वाहनाने पिकअपला जोरदार धडक दिल्याने पिकअप दोन्ही वाहनांमध्ये चिरडला गेला. यावेळी ट्रकमधील लोखंडी सळ्या पिकअपच्या काचा फोडून आतमध्ये शिरल्या आणि तरुण मुलांच्या शरीरात घुसल्या. यात जागीच 5 जण ठार झाले असून 13 जखमी होते. यात जखमी 2 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूंचा आकडा 7 वर गेलाय. या घटनेने आता नाशिक पोलिसांना खडबडून जाग आली आहे.

मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत

अपघातातील मृतांच्या वारशांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमींच्या औषधेापचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोमवारी सांगितलं.नाशिकमधील झालेल्या भीषण अपघातात ट्रकच्या बाहेर लोखंडी सळ्या होत्या. या सळ्या तरुणांच्या शरीरात घुसल्याने पाच जणांचा जीव गेला. माल वाहतुकीच्या वाहनांना नियम असतात. मात्र हे नियम रस्त्यांवर फिरणाऱ्या वाहनांना लागू नाहीत का? सर्वसामान्यांवर केली जाणारी कारवाई मालवाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर देखील तितक्याच प्रभावीपणे का लागू होत नाही? लोखंडी सळ्या अथवा एखादी कोणताही माल अवजड वाहनातून नेतांना एखादा कपडा किंवा वाहनाला रिफ्लेक्टर स्टेडियम का लावले जात नाही? आणि अशा नियमबाह्य वाहन चालक आणि संबंधितांवर पोलीस तात्काळ कारवाई का करत नाही?  असे एक ना अनेक प्रश्न आता या अपघातानंतर उपस्थित होत आहे. या अनुषंगाने नाशिक पोलसांनी विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.  

हेही वाचा:

Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्या

सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
Maharashtra Live News Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चागलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget