एक्स्प्लोर

Nashik Bribe News : लाचखोरीत नाशिक विभाग नंबर 1; राज्यात वर्षभरात 'इतके' गुन्हे दाखल

ACB : 2023 या वर्षभरात राज्यातील लाचखोरीच्या प्रमाणात घट होण्याऐवजी वाढ झाल्याचेच दिसून आले आहे. गत वर्षाच्या तुलनेत राज्यभरातील लाचखोरीत 70 गुन्ह्यांची वाढ झाली आहे. 

Nashik Bribe News : राज्याला लागलेली भ्रष्ट्राचाराची (Corruption) कीड संपायचे नाव घेत नाहीये. लाचखोरीला आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र लाचखोरांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. 2023 साली महाराष्ट्रात (Maharashtra News) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) तब्बल 803 गुन्हे नोंदवत 1 हजार 170 आरोपींना ताब्यात घेतले आहे.

803 गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे हे नाशिक विभागात (Nashik Division) दाखल झाले आहेत. नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या दमदार कामगिरीने नाशकात तब्बल 163 लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे लाचखोरीत नाशिक विभाग नंबर 1 ठरला आहे.  नाशिक पाठोपाठ पुणे विभागात १५० गुन्हे दाखल झाले आहेत. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये १२५ गुन्हे दाखल झाले आहेत. 

यंदा 70 गुन्ह्यांची वाढ

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आठ विभागांमध्ये लाचखोरी प्रमाण कमी-अधिक आहे. 2023 या वर्षभरात राज्यातील लाचखोरीच्या प्रमाणात घट होण्याऐवजी वाढ झाल्याचेच दिसून आले आहे. गत वर्षाच्या तुलनेत राज्यभरातील लाचखोरीत 70 गुन्ह्यांची वाढ झाली आहे. 

1098 लाचखोर जेरबंद

राज्यात एकूण 803 गुन्ह्यात 1170 आरोपींविरोधात लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. 4 कोटी 59 लाख 68 हजार 255 रुपयांच्या लाचेची रक्कम जप्त केली आहे. नाशिक विभागात नाशिकसह, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि नंदूरबार या जिल्ह्यांचा समावेश होतो. नाशिक एसीबीने सहकार, भूमी अभिलेख, महसूल आणि शिक्षण विभागातील लाचखोरीत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडून सर्वाधिक कारवाया करून 274 लाचखोरांना जेरबंद केले आहे. नाशिक विभागात गत 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये 37 लाचखोरीच्या गुन्ह्यांची वाढ झालेली आहे. 

नाशिक विभागातील महत्वाच्या कारवाया

भूमी अभिलेख विभागातील जिल्हा अधीक्षक महेश शिंदे व लिपीकावर ५० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याची कारवाई, सिन्नरचे सहायक निबंधक रणजित पाटील व लिपीक विरनारायण यांना २० लाखांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. जिल्हा निबंधक सतीष खरे यांना 30 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

जिल्हा हिवताप अधिकारी वैशाली पाटील यांच्यावरील कारवाई, शिक्षण विभागातील मोठी कारवाई म्हणजे शिक्षणाधिकारी व प्रशासनधिकारी सुनिता धनगर यांना 55 हजारांची स्वीकारताना पकडून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. दिंडोरीचे प्रांताधिकारी निलेश अपार यांचे वर 40 लाखांच्या लाचेच्या मागणी प्रसंगी कारवाई करण्यात आली. नाशिकचे तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांना घराच्या पार्किंगमध्ये 15 लाखांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.

राज्याची आकडेवारी पुढीलप्रमाणे

परिक्षेत्र दाखल गुन्हे  संशयित
मुंबई  41  56
ठाणे  103  144
पुणे 150 212
नाशिक  163 274
नागपूर 75 116
अमरावती  86 120
छत्रपती संभाजीनगर 125 168
नांदेड  60 80
एकूण  803 1,170

इतर महत्वाच्या बातम्या

Nashik Chhagan Bhujbal : एकच पर्व, ओबीसी सर्व...! चांदवड तालुक्यात भुजबळांच्या समर्थनार्थ विराट कँडल मार्च

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024 8 PMAditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्य

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Embed widget