एक्स्प्लोर

Nashik Chhagan Bhujbal : एकच पर्व, ओबीसी सर्व...! चांदवड तालुक्यात भुजबळांच्या समर्थनार्थ विराट कँडल मार्च

Nashik Chandwad News : चांदवड तालुक्यात छगन भुजबळांच्या समर्थनार्थ कँडल मार्च काढण्यात आला. 'भुजबळ साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', अशा घोषणांनी यावेळी परिसर दुमदुमून गेला होता.

Nashik Chandwad News नाशिक : चांदवड तालुक्यातील तिसगांव येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या समर्थनार्थ ओबीसी समाज तिसगाव चांदवड तालुका ओबीसी, भटके, विमुक्त आरक्षण बचाव कँडल मोर्चा समता परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दिलीप खैरे (Dillip khaire) व समता परिषदेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक (Balasaheb kardak) यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आला. 

यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांवर जेसीबीमधून भव्य दिव्य फुलांची उधळण करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे हस्ते मशाल ज्योत पेटवून कँडल मार्चचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर तिसगाव येथील युवा वर्गाच्या हस्ते दिलिप खैरे यांचा पगडी देऊन सत्कार करण्यात आला. 

या घोषणांनी दुमदुमला परिसर

'समस्त ओबीसींची एकच चळवळ, छगन भुजबळ छगन भुजबळ', 'एकच पर्व,ओबीसी सर्व','भुजबळ साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', 'दिलीप आण्णा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है', अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

ओबीसी समाज एकवटला

यानंतर नंदू मंडलिक यांनी ओबीसी आरक्षण मोर्चाची गरज काय? याबाबतची माहिती दिली. रघुनाथ आहेर यांनी तिसगांव सोबतच चांदवड तालुका आता या लढाईत कुठेच मागे राहिला नाही, ओबीसी लढ्यात आम्ही तुमच्या सर्व बांधवांच्या सतत सोबत आहोत, असे सांगितले. सुनील पैठणकर म्हणाले की, ओबीसी समाजाची आता एकजूट झालेली आहे. त्यामुळे आपण कितीही मोठ्या संकटावर शंभर टक्के मात करू शकतो. 

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, मात्र ओबीसी कोट्यातून नको

समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी घटनेचा आधार घेऊन आरक्षण चळवळ कायदेशीर भाषेत समजावून सांगितली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे परंतु ओबीसी कोट्यातून नको,त्याला आम्हा ओबीसी बांधवांचा विरोध आहे. आमचा लढा ना कुणाच्या विरोधासाठी, तो फक्त आमच्या संविधानिक हक्कासाठी असल्याचे यावेळी कर्डक यांनी सांगितले. 

या  कँडल मार्चला समता परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी, जिल्हाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर दराडे, अंबादास खैरे, समता परिषद नाशिक महिला जिल्हाध्यक्ष पूजा आहेर, समता परिषद नाशिक जिल्हा उपाध्यक्ष रघुनाथ आहेर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भुजबळ समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

आणखी वाचा 

Nashik News : सुविचार गौरव पुरस्कारांचे अजितदादांच्या हस्ते वितरण; सुरेश वाडकर, गौरव चोपडांसह आठ जणांचा होणार सन्मान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  

धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम

अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली

संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anjali Damania on Beed Case | SIT रद्द करून संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी ऑन कॅमेरा करा- दमानियाAvinash Naikwade Beed | भर पत्रकार परिषदेत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय अविनाश नाईकवाडेंना अश्रू अनावरABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 06 January 2025BMC Recycling Plant | BMC कडून टिकाऊ मोडतोड व्यवस्थापनासाठी दहिसरमध्ये रिसायकलिंग प्लांट सुरू

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
अजित पवारांनीही राजीनामा दिला होता, धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीत तोपर्यंत लढायला हवं, अंजली दमानियांचा हल्लाबोल  
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; पण राजीनाम्याच्या चर्चेला मुंडेंकडून पूर्णविराम
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
अंजली दमानियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; फडणवीसांकडे प्रमुख 5 मागण्या, वाल्मिक कराडची कुंडलीच काढली
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
संशयाची सुई धनंजय मुंडेंकडे आहे; अजित पवारांच्या भेटीनंतर संतापले जितेंद्र आव्हाड, बीड प्रकरणावरुन घेरलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जानेवारी 2024 | सोमवार

पुण्यात भाजप युवा मोर्चा सचिवाच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि 28 काडतुसे, प्रवासादरम्यान एअरपोर्टवर अटक!

Suresh Dhas Full PC : जोपर्यंत तपास संपत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंनी पदावर राहू नये

अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!

Embed widget