Nashik Crime News : फायनान्स रिकव्हरी एजंटनेच केली मोटार सायकलींची चोरी; सात दुचाकी हस्तगत
Nashik News : रिकव्हरी एजंटच मोटारसायकलीची चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये घडला आहे. या चोराला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून सात मोटारसायकली जप्त करण्यात आला आहेत.
Nashik Crime News नाशिक : रिकव्हरी एजंटच (Recovery Agent) मोटारसायकलीची (Two-Wheeler) चोरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये (Nashik News) घडला आहे. एमआयडीसी चुंचाळे पोलीस (MIDC Chunchale Police) चौकीच्या पोलिसांनी या चोराला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 4 लाख 40 हजार रूपये किंमतीच्या चोरी केलेल्या 7 मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
अंबड औद्योगिक वसाहत, म्हाडा, दत्तनगर, घरकुल परिसरातून मोठ्या प्रमाणात मोटार सायकलींची चोरी झाली होती. चोरांचा शोध घेवून मोटार सायकलीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे अंबड एमआयडीसी पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस शिपाई श्रीहरी पांडुरंग बिराजदार यांना मोटारसायकल चोर हा शांतीनगर झोपडपट्टीजवळ, डोंगर बाबा खदान, या परिसरात असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित जेरबंद
मिळालेल्या माहितीची शहानिशा करून चोरावर कारवाई करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदिप पवार, पोलीस नाईक समाधान चव्हाण, पोशि जनार्दन ढाकणे, दिनेश नेहे, अर्जुन कांदळकर, किरण सोनवणे, सुरेश जाधव, श्रीहरी बिराजदार, संदिप खैरणार, अनिल कुन्हाडे यांना सूचना दिल्या. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV Footage) आधारे संशयित अभिषेक प्रशांत गौतम यास ताब्यात घेतले.
मोटारसायकलींची दिवसाढवळ्या चोरी
चोराची कसून चौकशी केली असता तो मर्दान फायनान्स कंपनीचे रिकव्हरी एजन्सीचा कामगार असून तो एमआयडीसीमधील कंपनी व बिल्डींगच्या पार्किंगमधून मोटारसायकल दिवसाढवळ्या घेऊन जात असे. त्यास कोणी काही विचारल्यास तो फायनान्स कंपनीकडून आलो असल्याचे सांगून मोटारसायकलची चोरी करत असल्याचे निष्पन्न झाले.
चार गुन्हे उघडकीस
रिकव्हरी एजंटची पोलिसांनी अधिक चौकशी केली. यात आणखी चार गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कामगिरी प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, पोलीस उप निरीक्षक संदीप पवार, पोना समाधान शिवाजी चव्हाण, पोलीस शिपाई श्रीहरी पांडुरंग बिराजदार, पोशि सुरेश रामू जाधव, पोलीस शिपाई अर्जुन कारभारी कांदळकर, पोलीस शिपाई दिनेश मधुकर नेहे, पोशि अनिल नाना कुऱ्हाडे, जनार्दन लक्ष्मण ढाकणे, किरण निवृत्ती सोनवणे, संदिप खैरनार यांनी पार पाडली. पुढील तपास हवालदार अविनाश चव्हाण, महेश सावळे, अमीर शेख हे करीत आहेत.
आणखी वाचा