एक्स्प्लोर

Sushma Andhare : "राम मंदिर उद्घाटन हे पॉलिटिकल टूल किट, तुम्ही रामराज्य आणू शकणार का?" सुषमा अंधारेंचा नाशिकमधून हल्लाबोल

Nashik News : काल राम मंदिर उद्घाटनाचे (Ram Mandir Inguration) पॉलिटिकल टूल किट करण्यात आले. तुम्ही रामराज्य आणू शकणार आहात का ? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे.

Sushma Andhare नाशिक : काल राम मंदिर उद्घाटनाचे (Ram Mandir Inguration) पॉलिटिकल टूल किट करण्यात आले. तुम्ही रामराज्य आणू शकणार आहात का? मोदींच्या काळात दुपारी १२ वाजता देखील स्त्री निर्भयपणे रस्त्याने वावरू शकत नाही, असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी नाशिकला राज्यव्यापी अधिवेशनात केला.  

सुषमा अंधारे म्हणाल्या की,  हे अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे. अनेक गोष्टीसाठी नाशिक प्रसिध्द आहे. नाशिकमध्ये ललित पाटील सारख्याला पाठीशी घालणारे काही नेते फिर भी मेरी दाढी कैसी सफेद है, असे दाखवणारे काही बदमाश इथे आहे, असा टोला त्यांनी दादा भुसे यांना लागवला आहे.

पुन्हा सत्तेची नांदी

उगाचच उडता तीर आपल्या अंगावर घेत मीच बडी भाबी मीच छोटी भाबी,  असे म्हणणारे लोक देखील या नाशिकमध्ये आहेत. पण त्याही पेक्षा नाशिकमधील काही ऐतिहासिक स्थळ भगूर सावरकरांचे जन्मस्थळ, काळाराम मंदिर, मंदिराच्या बाहेर बाळासाहेब आंबेडकरांचा शिलालेख आहे. याला उद्धव ठाकरेंनी अभिवादन केले. १९९४ साली नाशिकचे अधिवेशन झाल्यानंतर शिवसेनेची सत्ता आली होती. आता पुन्हा सत्ता येण्याची नांदी असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्धव ठाकरेंचे कौतुक

या महाराष्ट्रात ५० टक्के लोकसंख्या महिलांची आहे. राम एकधर्म आणि एक पत्नी होता. काल उद्धव ठाकरेंनीआरती केली पण पत्नीचे सर्व सन्मान दिले, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंची कौतुक केले.  काही नेते मात्र काल एकटेच पळत होते. एकटेच सर्व काही करत होते आणि पत्नी वनवासात होती, अशी टीका त्यांनी भाजप नेत्यांवर केली. 

आशिष शेलारांना डिवचले

आशिष कुरेशी म्हणत आशिष शेलारांना त्यांनी डिवचले. यांचे मोठे नेते आरोप करतात ७० हजार कोटींचा उल्लेख करतात आणि दुसऱ्या दिवशी ते त्यांना पक्षात सामील करून घेतात.   हे कसले एकवचनी, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.  

मोदींच्या काळात महिलांचा अपमान

देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही म्हणतात आणि भर दुपारी २ वेळ लव्ह मॅरेज करतात. मोदींच्या काळात रात्री १२ नाही तर दिवसा सुद्धा महिला सुरक्षित नाहीत. महिलांचा अपमान केला जातो. राष्ट्रपतींना बोलवले जात नाही. महिलाना न्याय देत नाही तरी महिला आरक्षणाचे गाजर दाखवतात. जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय महिलांना आरक्षण मिळणार नाही, असेही त्या यावेळी म्हणाल्या. 

आणखी वाचा

Sanjay Raut : "शिवसेना नसती तर अयोध्येत काल रामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती"; नाशकात संजय राऊत कडाडले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget