एक्स्प्लोर

Nashik Crime: तुरुंगातून सुटलेल्या कुख्यात गुंडाची नाशिकमध्ये रॉयल मिरवणूक, 'बॉस इज बॅक'च्या घोषणांनी शरणपूरचा परिसर दणाणला

Nashik News: कारागृहातून बाहेर येताच गुंडाची सिनेस्टाईल मिरवणूक, शरणपूर रोडवर भरदिवसा वाजतगाजत केला जल्लोष. सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला नसल्याची नागरिकांची भावना

नाशिक: गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात गुन्हेगारी घटना वाढल्याची सातत्याने चर्चा सुरु आहे. अशातच आता नाशिकमध्ये गुन्हेगारांचं उदात्तीकरण होत असल्याची एक घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये अलीकडेच हर्षद पाटणकर (Harshad Patankar) या गुंडाला तुरुंगातून सोडण्यात आले.  यानंतर या गुंडाच्या समर्थकांनी त्याची शहरात जंगी मिरवणूक काढली. या मिरवणुकीची नाशिकमध्ये (Nashik Crime) चांगलीच चर्चा रंगली आहे. ही मिरवणूक म्हणजे एकप्रकारे पोलीस यंत्रणेलाच आव्हान असल्याचे आता बोलले जात आहे. त्यामुळे आता याप्रकरणात पोलीस काय कारवाई करणार, हे पाहावे लागेल.

एमपीडीए अंतर्गत कारागृहात असणाऱ्या हर्षद पाटणकर याची नुकतीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली होती. यानंतर शरणपूर रोड परिसरात पाटणकरच्या समर्थकांनी त्याची जंगी मिरवणूक काढली. यावेळी एक छोटेखानी रोड शो देखील झाला. या मिरवणुकीत तडीपार गुंड, सराईत गुन्हेगारांसह  टवाळखोरांचाही सहभाग होता. या मिरवणुकीत चारचाकी महिंद्र एक्सयुव्ही 300 आणि 10 ते 15 बाईकचा सहभागी होत्या. शरणपूर रोडवरील बैथेल नगर ते आंबेडकर चौक, साधू वासवाणी  रोड, शरणपूर रोड परिसरातून हर्षद पाटणकरची मिरवणूक काढण्यात आली. या घटनेमुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहिला आहे की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ही मिरवणूक आणि रोड शो सुरु असताना वाहनांच्या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाने शरणपूर   परिसर दणाणून गेला होता.   याशिवाय, मिरवणुकीतील सहभागी झालेले टवाळखोर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत होते. या सगळ्यांकडून बॉस इज बॅकच्या घोषणाही दिल्या जात होत्या. यानंतर हर्षद पाटणकरच्या समर्थकांनी  सोशल मीडियावर काही व्हीडिओ अपलोड केले. हे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्याची जोरदार  चर्चा आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. मिरवणूक काढून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी, दहशत माजविल्याप्रकरणी  सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षद पाटणकर गुन्ह्यांसाठी कुख्यात

अंकुश शिंदे यांनी जुलै महिन्यात नाशिकच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर झोपडपट्टीदादाविरोधी कलमान्वये (एमपीडी) हर्षद पाटणकर याच्यावर कारवाई झाली होती. त्याच्याविरोधात सरकारवाडा, पंचवटी, इंदिरानगर, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यात जबर दुखापत, चोरी, घरफोडी, शिवीगाळ व दमदाटी, खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.

आणखी वाचा

पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगारांची परेड; 109 पोलीस ठाण्यातील अट्टल गुन्हेगार एका रांगेत चिडीचूप उभे!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 18 January 2024Saif Ali Khan Case Update : सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक संशयित मध्य प्रदेशातून ताब्यातSantosh Deshmukh Accse Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील ६ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 18 January  2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Beed News : बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
बीडमध्ये महिला सरपंचाकडे खंडणीची मागणी, महिलेचा गंभीर इशारा; म्हणाल्या, आम्हाला न्याय द्या,नाहीतर...
Team India Announced for Champion Trophy 2025 : शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
शुभमान गिल उपकॅप्टन, विकेटकीपिंगसाठी के एल राहुलला प्राधान्य, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीमची 5 वैशिष्ट्ये!
India Squad For Champions Trophy Live : तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
तब्बल 14 महिन्यांनी टीम इंडियाच्या तोफेची वापसी, बुम बुम बुमराह सुद्धा फिट; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोणाकोणाला मिळाली संधी?
Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार
Embed widget