एक्स्प्लोर

Nashik Crime : बाळंतिण असून राहत्या घरी लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले; नाशकात दीड लाखांची लाच घेताना 'पुरातत्व'चे तेजस गर्गे, आरती आळे जाळ्यात

आळे यांच्या चौकशीत महाराष्ट्र राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय संचालक तेजस गर्गे यांचा देखील हिस्सा असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक : राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय संचालक तेजस गर्गे आणि याच विभागातील नाशिकच्या (Nashik Crime) सहाय्यक संचालिका आरती आळे यांच्याविरोधात दीड लाखांच्या लाच प्रकरणी नाशिक एसीबीने (Nashik ACB) गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. तक्रारदाराला कंपनी चालू करण्यासाठी पुरातत्व विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्राची गरज होत. ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी आरती आळे यांनी 6 मे 2024 रोजी दीड लाखांच्या लाचेची मागणी केली होती.  आळे यांच्या चौकशीत महाराष्ट्र राज्याचे पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय संचालक तेजस गर्गे यांचा देखील हिस्सा असल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरती आळे या सध्या बाळंतिण आहेत, तर तेजस गर्गे यांचा एसीबीकडून शोध घेतला जात आहे. संशयित आरती मृणाल आळे (आरती मृणाल आळे, वय 41 वर्ष, रा. फ्लॅट नंबर 17, ए विंग,अनमोल नयनतारा, रानेनगर, नाशिक ) यांना दीड लाख रूपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. तेजस गर्गे (डायरेक्टर पर्यटन व सांस्कृतिक संचलणालय विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई रा.इमारत क्र.6 फ्लॅट न.20, लाला कॉलेज जवळ, महालक्ष्मी रेसकोर्सजवळ, मुंबई) यांनी लाचेच्या रकमेमधून त्यांचा हिस्सा घेण्यास संमती दिली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कारखाना सुरु करण्यासाठी दीड लाखांच्या लाचेची मागणी 

तक्रारदाराने कारखाना सुरू करण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या नाशिकमधील सहाय्यक संचालक कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी सहायक संचालक पुरातत्व व संग्रहालय यांच्या कार्यालयाकडे अर्ज केला होता. ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात आरती आळे यांनी दीड लाखांच्या लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मीष्ठा घारगे-वालावलकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार सापळा रचण्यात आला. लाचेची रक्कम मंगळवारी स्वीकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलिस निरिक्षक एन. बी.सूर्यवंशी, व सुवर्णा हांडोरे यांनी आळे यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. यानंतर चौकशीत गर्गे यांचंही नाव समोर आलं त्यांच्याविरूद्धही इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Embed widget