एक्स्प्लोर

Nylon Manja : नायलॉन मांजाने कापला दुचाकीस्वाराचा गळा, जखमेवर तब्बल 40 टाके, थोडक्यात वाचला जीव अन्यथा... नाशिकमधील धक्कादायक घटना

Nashik News : नाशिकच्या वडाळ नाका भागात कामावरून घरी परतत असताना एका दुचाकीस्वाराचा नायलॉन मांजाने गळा कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Nashik News : नाशिकच्या वडाळ नाका (Wadala Naka) भागात कामावरून घरी परतत असताना एका दुचाकीस्वाराचा नायलॉन मांजाने (Nylon Manja) गळा कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचार सुरू आहे. मुशरन मोहसीन सय्यद असं जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मुशरन सय्यद हे मेनरोड (Main Road) येथील कापड दुकानात कामाला आहेत. मुसरन हे सायंकाळी दुचाकीवरून वडाळा नाका परिसरात जात असताना त्यांच्या गळ्याला नायलॉन अडकला. त्यामुळे ते गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. त्याच अवस्थेत नागरिकांनी त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 

नायलॉन मांजा हद्दपार करा

डॉक्टरांनी सय्यद यांच्यावर तात्काळ उपचार करत जखमेवर 40 टाके घातल्याने त्यांचा जीव वाचल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. पोलिसांकडून नायलॉन माझ्या विरोधात सुरू असलेली कारवाई तुडकी पडत असल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केला आहे. तर या नायलॉन मांजावर लवकरात लवकर बंदी घालून नायलॉन मांजा हद्दपार करा, अशी मागणी आता जोर धरत आहे.  

75 संशयितांवर तडीपारीची कारवाई

दरम्यान, नायलॉन मांजामुळे होणारे अपघात लक्षात घेत नाशिक पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आयुक्तालय हद्दीत 75 नायलॉन मांजा विक्रेत्यांविरुध्द प्रथमच हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. मकरसंक्रांतीला शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंगबाजी केली जाते. मकरसंक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी होत असून शहरात मागील काही दिवसांपासून पतंगबाजी सुरू झाली आहे. ती वाढल्यावर नायलॉन व तत्सम मांजामुळे होणारी जीवितहानी अथवा गंभीर दुखापत रोखण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार विविध पोलीस ठाणे, गुन्हेशाखा पथकांनी केलेल्या धडक कारवाईत 34 गुन्हे दाखल करुन 39 जणांना अटक केली आहे. तर मांजा खरेदी व विक्रीसह तो वापरात आणणाऱ्या जवळपास 75 संशयितांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
Maharashtra Rain LIVE Updates: : महाराष्ट्राभरात पावसाचं थैमान! नाशिक जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा अंदाज, त्रंबकेश्वर, सप्तशृंगी मंदिरसह शाळा महाविद्यालये बंद
धक्कादायक! धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, नाशिकच्या देवळा तालुक्यातील घटना
धक्कादायक! धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या 22 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, नाशिकच्या देवळा तालुक्यातील घटना
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
Nashik Rain : नाशिकमध्ये ढगफुटी झाली का? सरकारचा अंदाज का चुकला? प्रत्येक तालुक्यात नेमका किती पाऊस झाला? आकडेवारी समोर
नाशिकमध्ये ढगफुटी झाली का? सरकारचा अंदाज का चुकला? प्रत्येक तालुक्यात नेमका किती पाऊस झाला? आकडेवारी समोर

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News: खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
खाकी वर्दीची मग्रुरी! बिअर शॉपीच्या फलकाचा वाद अन् पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण, दुकानदारावर आले बहिरेपण; नागपुरातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
राज्यभरात पावसाचं रौद्ररूप! आळंदीत इंद्रायणी नदीला पूर, पुण्याचं खडकवासला धरण शंभर टक्के भरलं; आजही पावसाचा जोर कायम राहणार? वाचा तुमच्या जिल्ह्याची खबरबात
Ind vs ENG 3rd T20: इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
इंग्लंडने लोळवले, भारत 76 धावांवर गारद; कधीही विचार केला नसेल...टीम इंडियाच्या नावावर 5 लज्जास्पद विक्रम
Dipali Sayyed : तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
तुम्हाला का झोंबतंय? 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स'वर रुपाली चाकणकरांचा 25 कोटीचा दावा, दिपाली सय्यद यांचा रोख सवाल
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
रेल्वे पीएसयू कंपनीला 35.82 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची आंतरराष्ट्रीय लोकोमोटिव्ह ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
ह्रदयद्रावक... सेल्फी घेताना मित्र खदानीत पडला, मित्राला वाचवताना दोघेही बुडाले; तिघांचा मृत्यू, गावावर शोककळा
Vasai Virar Rain Local Train Updates: काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
काळाकुट्ट अंधार, रुळांवर पाणी, पण डोळ्यांसमोर फक्त घर; मुंग्यांसारखे एका रेषेत चालणारे प्रवासी, वसई-विरार ट्रॅकवरील रात्री 12.45 वाजताचा धडकी भरवणारा VIDEO
Sharad Pawar Camp and BJP: मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये जयंत पाटील-विनोद तावडेंची गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
जयंत पाटील-विनोद तावडेंची मुंबईत गुप्त भेट, दिल्लीतली बैठक संपल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Embed widget