एक्स्प्लोर

वीर जवान अमर रहे! जवान संदीप मोहिते अनंतात विलीन, काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

Nashik News : शहीद जवान संदीप मोहिते यांचे पार्थिव नुकतेच मांडवड गावी दाखल झाले. यावेळी भारत माता की जय, वीर जवान अमर रहे अशा घोषणा देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.

Nashik Nandgaon News नांदगाव : मांडवड येथील लष्करी सेवेत असलेले जवान संदीप भाऊसाहेब मोहिते (Sandip Mohite) हे लेह लडाख (leh ladakh) येथे मशीन ऑपरेटिंग करताना गुरुवारी शहीद झाले. जवान संदीप मोहिते यांचे पार्थिव नुकतेच मांडवड (Mandwad) गावी दाखल झाले. यावेळी भारत माता की जय, वीर जवान अमर रहे अशा घोषणा देत शहीद जवान मोहिते यांना अखेरचा निरोप देण्यात आला. मोहिते कुटुंबियांनी यावेळी हंबरडा फोडला. आज सकाळी 11 वाजता शहीद जवान मोहिते यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

जवान संदीप मोहिते हे १०५ इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये हवालदार या पदावर कार्यरत होते. सन २००९ मध्ये ते भारतीय सैन्यदलात (Indian Army) भरती झाले होते. अपघात झाल्याने त्यांना लेह लडाखच्या सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून वीरगती प्राप्त झाल्याचे सांगितले. नांदगावचे तहसीलदार सिध्दार्थ मोरे,पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी, गटविकास अधिकारी संदीप दळवी तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जगताप, दिनेश पगार, माजी सैनिक नानासाहेब काकळीज यांनी संदीप मोहिते यांच्या निवासस्थानी जात घटनेची माहिती दिली.

2009 पासून होते सैन्य दलात

संदीप मोहिते हे 2009 साली सैन्यदलात (Indian Army) भरती झाले. त्यांनी पुणे (Pune) येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चंदीगड,अरुणाचल प्रदेश,पठाणकोट, येथे सेवा बजावली. याच दरम्यान साऊथ सुडान येथे विदेशात शांतीसैनिक म्हणून शांतीसेनेत त्यांनी काम केले होते. आता ते लेह लडाख येथे कार्यरत होते, अशी माहिती त्यांचे सैन्यदलातील सहकारी दिपक सोमवंशी (Dipak Somwanshi) यांनी दिली आहे. 

गेल्या आठ वर्षांपूर्वी मामाची मुलगी मनिषा यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता. सकाळीसच पती-पत्नीमध्ये भ्रमणध्वनी वरुन संभाषण झाले होते. त्यांच्या पश्चात देवराज (5) दक्ष (3) अशी दोन मुले असून वडील भाऊसाहेब मोहीते,आई प्रमिला मोहीते भाऊ शिवाजी मोहिते हे आपला शेतीव्यवसाय करत असून श्रीकांत मोहिते हे सैन्यदलात आहे. मांडवड (Mandwad) बारखडी शिवारात शहीद जवान मोहिते यांचे निवास्थान आहे. त्यांच्या निवासस्थानाकडे जाण्यासाठी तत्काळ रस्त्याचे काम जेसीबीद्वारे पूर्ण करण्यात आले.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambit Patra on Gautam Adani : छत्तीगडमध्ये काँग्रेसच्या काळात अदानींची गुंतवणूक कशीKolhapur School Prayer : ए मत कहो खुदासे या प्रार्थनेवर पालकांचा आक्षेपRahul gandhi PC On Adani : “अदानींवर अमेरिकेचेही गंभीर आरोप, पण अटक होणार नाही, कारण…”- गांधीHemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
Rajesaheb Deshmukh: धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी, सांगितली इनसाईड स्टोरी
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर राहु आणि शनीची युती; 2025 पासून 'या' 3 राशींचा सुवर्णकाळ सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
Rajesh Kshirsagar : हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
हिशेब चुकता केला जाईल म्हणजे काय? माझ्यावर काल दोन वेळा जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न; राजेश क्षीरसागरांचा गंभीर आरोप
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
तब्बल 30 वर्षांनी मतदानाचा टक्का वाढला; तेव्हा पवारांची सत्ता युतीने खेचली अन् आता युतीविरोधात तेच पवार उभा ठाकले! निकराच्या झुंजीत कोण बाजी मारणार?
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
प्रणिती ताईंची गाडी फोडण्याआधी तुझी गाडी फोडतो; काँग्रेसच्या युवक नेत्याचा इशारा; मविआत मोठी बिघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क
एक्झिट पोलच्या निकालानंतर मविआचे वाऱ्याची दिशा ओळखणारे जाणते नेते कामाला लागले
Ajit Pawar vs Yugendra Pawar: बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, उत्तम जानकरांचा धक्कादायक दावा
Embed widget