Manoj Jarange : मला मंडल आयोगाला चॅलेंज करायचं नाही, भुजबळांना समजावून सांगा; नाशिकमधून जरांगेंचा हल्लाबोल
Manoj Jarange Reply To Chhagan Bhujbal : नाशिक हा भुजबळांचा बालेकिल्ला नाही, तो सर्वांचाच आहे, भुजबळांनी नाभिक समाजाचा अपमान केला असून त्यांची माफी मागावी असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केली.
![Manoj Jarange : मला मंडल आयोगाला चॅलेंज करायचं नाही, भुजबळांना समजावून सांगा; नाशिकमधून जरांगेंचा हल्लाबोल manoj jarange on chhagan bhujbal nashik maratha reservation said will not challenge obc mandal commission maharashtra marathi news Manoj Jarange : मला मंडल आयोगाला चॅलेंज करायचं नाही, भुजबळांना समजावून सांगा; नाशिकमधून जरांगेंचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/08/e49a07eef062c0acb5795e4c607a3e4f170739502948093_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे (Manoj Jarange) आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरूच आहे. खरा पाटील असशील तर मंडल आयोग (Mandal Commission) संपवून दाखव असं आव्हान छगन भुजबळांनी दिलं होतं. आता भुजबळांच्या या आव्हानाला जरांगे यांनी नाशिकमधून प्रत्युत्तर दिलंय. माझ्या नादाला लागू नकोस, मला मंडल आयोगाला चॅलेंज करायचं नाही, भुजबळांना हे समजावून सांगा असं जरांगे यांनी म्हटलंय.
काय म्हणाले होते छगन भुजबळ ?
सगेसोयरे अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर व्हावं यासाठी 10 फेब्रुवारीपासून जरांगे आमरण उपोषण करणार, भुजबळांमुळे आम्हाला मंडल आयोगाला चॅलेंज करावं लागेल असा इशारा मनोज जरांगेंनी दिला होता. त्यानंतर भुजबळांनी त्यावर जरांगेंना आव्हान दिलं होतं. मंडल आयोग हा ओबीसी आरक्षणाचा निर्माता, खरा पाटील असशील तर मंडल आयोग संपवून दाखव असं आव्हान राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना दिलं होतं. त्यावर जरांगे यांनी आता प्रत्युत्तर दिलं. मनोज जरांगे म्हणाले की, तुला पुन्हा सांगतो माझ्या नादी लागू नको, मंडल कमिशन जाईल. ओबीसी बांधवांना सांगतो, मला मंडल कमीशनला चॅलेंज करायचे नाही, त्याला समजावून सांगा.
काय म्हणाले मनोज जरांगे?
भुजबळांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे म्हणाले की, नाशिक हा भुजबळांचा बालेकिल्ला आहे असं कोण म्हणतं? त्याचा काय संबंध? सर्व जातींचा हा बालेकिल्ला आहे. सरकारमध्ये बदल होत नाही, जनताच तो बदल करते. आम्ही आमच्या मागण्यांसाठी देवीच्या दर्शनाला आशीर्वाद घ्यायला येतो. भुजबळ, तू पुन्हा पुन्हा चिथावणी देऊ नको. तुझ्यासहित सगळं बाहेर काढतो. मला चॅलेंज देऊ नको, मी पाटील आहे म्हणूनच ओबीसीत जाऊन दाखवले.
नाभिक समाजाची माफी मागा
तुझ्यासारखं ओबीसींच खाऊन वर तंगडी करणारा मी नाही, खानदानी पाटील आहे असंही जरांगे म्हणाले. ते म्हणाले की, तू ओबीसी असेल तर नाभिक समाजाची माफी माग, तू एकाला नाही तर पूर्ण समाजाला बोलला आहे.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)