Nashik Graduate Constituency Election : नाशिक पदवीधर निवडणूक : डॉ सुधीर सुरेश तांबे यांच्यासह चार उमेदवारांची माघार
Nashik Padvidhar Election : नाशिक पदवीधर निवडणुकीत आज डॉ. सुधीर तांबे यांच्यासह चार उमेदवारांनी माघारी घेतली आहे.
Nashik Padvidhar Election : नाशिक (Nashik Padvidhar Election) पदवीधर निवडणुकीत आज (16 जानेवारी) माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून आज डॉ. सुधीर तांबे यांच्यासह चार उमेदवारांनी माघारी घेतली आहे. मात्र माघारीचा दिवस संपला नसल्याने नाशिक पदवीधर निवडणुकीचे चित्र अद्याप अस्पष्ट असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.
नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत पहिल्या दिवसापासून राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. आज माघारीचा दिवस असून आतापर्यंत चार उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे समोर आले आहे. यात डॉ सुधीर सुरेश तांबे (Sudhir Tambe) यांची निवडणुकीतून माघार घेतली आहे. डॉ सुधीर सुरेश तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. याचबरोबर अपक्ष उमेदवार अमोल खाडे, हिंदुस्थान जनता पार्टीचे दादासाहेब हिरामण पवार आणि धनंजय जाधव यांनी देखील माघार घेतली आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणूक रिंगणात 18 उमेदवार आहेत. मात्र अद्याप माघारीचा दिवस शिल्लक असल्याने आणखी काय चित्र पालटते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
नाशिकची पदवीधर मतदारसंघाची निवडणूक दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून ते आजपर्यत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. या सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज न भरता सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना एबी फॉर्म मिळाल्यानंतरही अशी घडामोड घडल्याने अखेर काँग्रेस पक्षाने सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे तांबे कुटुंबी अडचणीत आले. त्यानंतर डॉ. सुधीर तांबे यांनी भूमिक मांडण्यासही नकार दिला. तर आज माघारीच्या दिवशी आतापर्यंत चार उमेदवारांनी माघार घेतली आहे.
पनवेल येथील डमी उमेदवार...
दरम्यान नाशिक पदवीधरसाठी रायगड पनवेल इथून देखील उमेदवारी अर्ज भरण्यात आला होता. तो उमेदवार म्हणजे डॉ. सुधीर तांबे होय, हे सुधीर तांबे अन् संगमनेरचे सुधीर तांबे हे दोघेही वेगवगेळे मात्र नाव एकाच. एकसारखे नाव असल्याने दाखल पनवेलच्या सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज केला होता. संगमनेरच्या डॉ. सुधीर तांबे यांना एबी फॉर्म असून देखील अर्ज सादर केला नव्हता. मात्र पनवेल येथील उमेदवार सुधीर तांबे यांनी माघार घेतली असून त्याचबरोबर अपक्ष उमेदवार अमोल खाडे यांनी देखील माघार घेतली आहे. हिंदुस्थान जनता पार्टीचे दादासाहेब हिरामण पवार यांनी देखील माघार घेतली आहे.
धनंजय जाधव यांची माघार
नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून धनंजय जाधव यांनी माघार घेतली असून गिरीश महाजन आणि विखे पाटील यांच्या आदेशानुसार माघार घेतल्याचे जाधव म्हणाले. धनंजय जाधव हे भाजपचे कार्यकर्ते असून त्यांना एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र आज त्यांनी माघार घेत श्रद्धा आणि सबुरीच्या मार्गावर चालणार असल्याचे म्हणाले. तसेच भविष्यात पक्ष संधी देईल यावर विश्वास असून पक्षाने आदेश दिल्यानंतर सत्यजीत तांबे यांना मदत करणार असल्याचे धनंजय जाधव म्हणाले.