एक्स्प्लोर

कृषीमंत्री दादा भुसे शिंदेच्या गोटात दाखल? कालपर्यंत मुख्यमंत्र्यासोबत 'वर्षा'वर

Maharashtra Political Crises : एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केलाय. अशातच कालपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत असणारे दादा भुसेही शिंदे गटात सामील झाले आहेत.

Maharashtra Political Crises : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड शिवसेनेला महागात पडणार असून शिंदेंचा गट बुलंद होताना दिसतो. कालपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या सोबत मुंबईत असलेले कृषीमंत्री दादा भुसे यांनी देखील शिंदे यांच्या गोटात जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते आहे. त्यामुळे सोबतीततले शिलेदार ही हात सोडून जात असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोंडीत सापडले आहेत. 

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला खिंडार पाडत आमदारांचा एक मोठा गट आपल्या पाठिशी उभा केल्यानंतर शिवसेनेच्या किल्ल्याचा एकेक बुरुज ढासळताना दिसत आहे. शिवसेनेचे आणखी आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यापैकी कृषीमंत्री दादा भुसे यांच्यासह काही आमदार गुवाहाटीत दाखल झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जनतेशी संवाद साधत आपल्या मनातील खदखद सगळ्यांसमोर मांडली. शिंदे यांना उद्देशून ही त्यांनी भावनिक साद घातली. मात्र त्याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. त्यांच्या आवाहनानंतर देखील काही आमदार, शिंदे यांच्या गोटात दाखल होत आहेत. ही संख्या वाढतच चालली  असल्याने शिवसेना एकटी पडत चालल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शिंदे यांच्या गुवाहाटी येथील कलायमॅक्स नंतर उद्धव ठाकरे यांनी संवादातून आमदारांना देखील आवाहन केले. माझ्यासमोर येऊन राजीनामा मागा, मी द्यायला तयार आहे', यावेळी त्यांच्यासोबत असलेले आमदार देखील आज शिंदे गटाकडे पसार झाल्याचे दिसून आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावरून मातोश्रीकडे जात असताना काही मंत्र्यांना स्वतःच्या गाडीत वर्षावरून हॉटेल सेंट रेजिसला घेऊन गेले होते. त्यात गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, सदा सरवणकर, संतोष बांगर ही सर्व मंडळी देखील शिंदे गटाला मिळाली आहेत.

फोन चालू, ठावठिकाणा नाही

दरम्यान कालपर्यंत मुंबईत असलेले दादा भुसे आज सकाळपासून नेमके कुठे? आहेत याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र भुसे यांचा फोन रीचेबल असून ते  कुणाचाही फोन रिसिव्ह करत नसल्याने भुसे देखील शिंदे गटात गेल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

शिंदेचे निकटवर्तीय तर ठाकरेंचे विश्वासू

कृषीमंत्री दादा भुसे नाशिकमधील आमदार असून ते गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेशी जोडलेले आहेत. नाशिकमधील कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. म्हणून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू शिलेदार आहेत. मात्र त्या उलट भुसे हे शिंदे निकटवर्तीय असून त्यांच्यात घरोबा असल्याचे सांगितले जाते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; पाहा, दोन्ही संघांची संभाव्य Playing
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Jalgaon : जळगावात वंचितच्या उमेदवाराचा माघारीचा निर्णयChitra Wagh on Raut statement:जनता थोबाडात दिल्याशिवाय राहणार नाही,चित्रा वाघ यांनी राऊतांना सुनावलंMohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदानABP Majha Headlines : 7 AM  :19 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Mohan Bhagwat Nagpur : नागपूर येथे मोहन भागवत यांनी केलं मतदान
Lok Sabha Election Phase 1:  लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य  'मतपेटीत' होणार बंद
लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं आज मतदान, पूर्व विदर्भातील उमेदवारांचे भवितव्य 'मतपेटीत' होणार बंद
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
Maharashtra News LIVE Updates : आज विदर्भात पहिल्या टप्प्यासाठी पाच ठिकाणी मतदान
CSK vs LSG IPL 2024: आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; जाणून घ्या दोन्ही संघांची संभाव्य Playing XI
आज चेन्नई सुपर किंग्स अन् लखनौ सुपर जायंट्सचा सामना; पाहा, दोन्ही संघांची संभाव्य Playing
Horoscope Today 19 April 2024 : मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
मेष, वृषभ राशीच्या लोकांच्या खर्चात होणार वाढ, मिथुन राशीसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण
Travel : निळाशार समुद्र, आकर्षक दृश्य, निसर्गसौंदर्य..! महाराष्ट्रातील 'अशी' ठिकाणं, बघताच क्षणी प्रेमात पडाल, फोटोग्राफीची आवड होईल पूर्ण
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
बुमराहचा भेदक मारा, सूर्याचं अर्धशतक, रोमांचक सामन्यात मुंबईचा 9 धावांनी विजय
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
राहुल भाईचा बर्थडे जोरात, लखनौच्या खेळाडूंनी केएलच्या तोंडावर केक फासला, VIDEO Viral
Embed widget