Nashik Crime : मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून पत्नीचा खून, नाशिकमधील धक्कादायक घटना
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरातील वडाळा परिसरात महिलेच्या खुनाची (Women Murder) घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.
Nashik Crime : स्वातंत्र्य दिनाच्या (August 15) यादिवशी नाशिकमधून (Nashik) धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील वडाळा परिसरात महिलेच्या खुनाची (Women Murder) घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात संतापाचे वातावरण आहे.
नाशिकसह जिल्हाभरात स्वातंत्र्यदिनामुळे (Independance Day) उत्साहाचे वातावरण आहे. अशातच नाशिकमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा जीव घेतला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ पसरली असून नाशिक पोलिसांनी (Nashik Police) संशयित पतीस अटक केली आहे. संबंधित संशयितांने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा मोबाईल चार्जरच्या वायरीने गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील वडाळा गावात घडली आहे.
नाशिक शहरातील वडाळा परिसरात राहणारा रिजवान पठाण हा त्याची पत्नी व मुलांसह राहत होता. तो वारंवार त्याची पत्नी निनाज रिजवान पठाण हिच्या चरित्रावर संशय घेऊन तिच्याशी वारंवार भांडण करत होता. या कारणामुळे अनेकवेळा वाद होऊनही निनाज या कुटुंब सांभाळत होत्या. मात्र काल मध्यरात्री दोन ते पाच वाजेच्या दरम्यान रिजवान याने घरातील मोबाईलच्या चार्जरच्या सहाय्याने त्याची पत्नी निनाजचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून रिजवान याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.
वडाळा परिसर हा नाशिकचा केंद्रबिंदू म्हणून पाहिले जाते. वडाळा परिसरात दाटीवाटीचा भाग असल्याने अनेकदा गुन्ह्यांच्या घटना येथे पहायला मिळतात. यासाठी नाशिक पोलिसांनी याबाबत ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यातच महिला अत्याचाराच्या घटना पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. त्यामुळे यावर देखील प्रकर्षाने मोहीम राबविणे गरजेचे आहे.
कौटुंबिक अत्याचार घटनांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांमध्ये महिलांच्या कौटुंबिक अत्याचारांच्या घटनांत मोठी वाढ झाली असून आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नाशिक शहरात घडलेली घटना संताप आणणारी आहे. एकीकडे देशाच्या राष्ट्रपतीपदी महिला विराजमान असताना आजही महिला अत्याचार परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे देशाचे स्वातंत्र्याचे ७५ वर्ष साजरे करताना अशा प्रकारे महिलांच्या अत्याचाराच्या घटना कधी थांबतील असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे.
नाशिकमध्ये पुन्हा गुन्ह्यात वाढ
नाशिकची गुन्हेगारी काही अंशी कमी झाली असताना अशातच पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले. त्यातच कौटुंबीक अत्याचाराच्या सातत्याने समोर येत आहेत. या संदर्भात अनेकवेळा पोलिसांकडून समुपदेशन, चर्चासत्र राबविले जात असताना अशा पद्धतीने कौटुंबिक हिंसाचार वाढत आहेत. त्यामुळे या सर्वांवर वाचक असणे आवश्यक आहे.