Nashik Hanuman Birth Place : नाशिकची शास्रार्थ सभा पोलिसांच्या मध्यस्थीने गुंडाळली, 'काँग्रेसी' म्हटल्याने झाला वाद
Nashik Hanuman Birth Place : नाशिकची शास्रार्थ सभा प्रचंड गोंधळानंतर पोलिसांनी संपवली असून आता हनूमान जनस्थळाच्या वादाबाबत काय निर्णय होतो याकडे समस्त नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
Nashik Hanuman Birth Place : नाशिकची शास्रार्थ सभा प्रचंड गोंधळानंतर पोलिसांनी संपवली असून आता हनूमान जनस्थळाच्या वादाबाबत काय निर्णय होतो याकडे समस्त नाशिककरांचे लक्ष लागले आहे. नाशिक येथे आज सकाळपासून सुरु असलेल्या शास्रार्थ सभेत सुरु असलेला वाद अखेर वादातच संपल्याने या शास्रार्थ सभेतून काहीच फलश्रुती मिळाली नसल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यामुळे हनुमान जन्मस्थळाबाबतचा तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेली सभा वादळी ठरली.
गेल्या अनेक दिवसांपासून अनेक दिवसांपासून नाशिकच्या अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबतचा वाद वाढत चालला आहे. हा वाद मिटवण्यासाठी नाशिक व कर्नाटक येथील किष्किंदानगरीचे साधू महंतांनी शास्रार्थ सभेचे आयोजन केले होते. मात्र सकाळी सभा सुरु होण्यापूर्वीच बंद पडली. या ठिकाणी साधू महंतांकडून बसण्यावरून चांगलाच वाद झाला. हा वाद झाल्यानंतर काही काळ सभा थांबविण्यात आली. यावर रामजन्मभूमीचे प्रधानाचार्य यांनी देखील दिलगिरी व्यक्त करीत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
अखेर काही वेळांनंतर सभास्थळी अनेक साधू महंत उपस्थित झाले. साधू महंत लोक प्रतिनिधी आदींनी उपस्थिती दर्शवत हनुमान जन्मस्थळाबाबत तोडगा काढण्यासाठी एकत्र सभा सुरु झाली. मात्र सभा सुरु झाल्याच्या काही मिनिटानंतर लगेचच पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. आणि पुन्हा एकदा वादाला तोंड फुटले. त्यामुळे सभेचा मुद्दा बाजूलाच राहून बसण्याचा वादामुळे काही काळ गोंधळ झाला. सभेला उपस्थित असलेल्या गोविंदानंद महाराज आणि नाशिकच्या साधू महंतांमध्ये मध्ये वाद झाला. स्थानिक साधू महंतांनी माईक उगारल्याने गोविदानंद महाराज संतप्त झाले. त्यांनी उभे राहत माफी मागण्याची विनंती केली. यानंतर वाद इतका वाढला कि शेवटी पोलिसांना घटनास्थळी दाखल व्हावे लागले. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून सभा संपवली.
काँग्रेसी म्हटल्याचा राग
दरम्यान प्रचंड गोंधळानंतर चर्चासत्र थांबवण्यात आले असून किष्किंधा वरून आलेल्या गोविंदानंद महाराज आणि स्थानिक महंत यांच्यात मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी स्थानिक महंत सुधिरदास महाराज यांनी काँग्रेसी म्हणल्याचा राग गोविंदानंद महाराज यांना आला. यावेळी महंत सुधिरदास यांनी जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांना काँग्रेसी म्हणल्याचा आरोप गोविंदानंद महाराज यांनी केला. मात्र महंत सुधिरदास यांनी हे आरोप फेटाळले.
असा झाला वाद
सभेपूर्वी सभास्थळी बसण्यावरून साधू महंतांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळाले. हा वाद शमतोन शमतो तोच भर सभेत साधू महंत हमरी तुमरीवर आले. यावेळी उपस्थित महंताने बाजूला असलेला बूम उचलून महाराजांना उगारला. यावेळी गोविदानंदस्वरस्वती महाराजांनी उभे राहता आपला आक्रोश व्यक्त केला. यावेळी उपस्थितांनी दोघांनाही शांत राहण्यास सांगून सभा पुढे सुरु केली. मात्र वाद वाढतच राहिला. शेवटी सभास्थळी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आहे. अखेर हि सभा गुंडाळण्यात आल्याचे प्राथमिक माहिती असून साधू महंतांच्या वादात हनुमान जन्मस्थळ नेमके कुठे हा वाद बाजूलाच राहतो कि काय ? असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे.