(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik NCP Dasara : नाशिकमध्ये राष्ट्रवादीने दसऱ्याला आपट्याची काळी पाने वाटली? 'हे' आहे कारण
Nashik NCP Dasara : नाशिकमध्ये (Nashik) राष्ट्रवादी युवक काँग्रेसने (NCP) सीएनजी दरवाढी (CNG Rate) विरोधात आपट्याची काळी पाने वाटून आंदोलन केले.
Nashik NCP Dasara : सतत वाढणाऱ्या पेट्रोल-डीझेलच्या (Petrol Rate) किमतीला पर्याय म्हणून वाहनधारक नैसर्गिक वायूकडे वळलेले असताना नैसर्गिक वायूच्या किमतीही झपाट्याने वाढत असल्याने त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सीएनजी पंपावरील (CNG Pump) ग्राहकांना काळी आपट्याची पाने वाटप उपहासात्मक आंदोलन केले.
मागील काही वर्षात महागाईने (Inflation)) डोके वर काढले असून नाशिक (Nashik) शहरात सीएनजीच्या (CNG Rate) दरात प्रतिकिलो चार रुपयांची मोठी वाढ करण्यात आली आहे. यामुळेच आता सीएनजी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅस दरात मोदी सरकारकडून सतत दरवाढ करण्यात येत आहे. सीएनजी गॅस जर वाढत असल्याने वाहनचालकांना मोठा फटका सहन करावा लागत आहे. नाशिकमध्ये सीएनजी 92 वरून 96 पोहोचला आहे. दरम्यान दसरा सणाला आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे. परंतु सध्या डिझेल पेक्षा सीएनजीचे भाव जास्त असल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आपट्याची काळे पाने वाटून निषेध आंदोलन करण्यात आले.
दसऱ्याच्या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतिक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने वाटण्याची प्रथा आहे. महागाईमुळे नागरिकांचे सर्वच सणावर पाणी फिरलेले असताना मोदी सरकार नवनवीन माध्यमातून जनतेला महागाईच्या खाईमध्ये ढकलत आहे. पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतीला पर्याय म्हणून सरकारने नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय दिला व त्यानुसार वाहनधारक त्याकडे वळाले सुद्धा परंतु सद्यस्थितीत डीझेलच्या किमतीपेक्षा सीएनजीची किमती जास्त असल्याने वाहनधारक आपल्या कपाळावर हात मारून घेत आहे.
महागाई गेल्या काही वर्षांतील सर्वोच्च स्थराला पोहोचली आहे. सर्व वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताना यामध्ये भर पडलीयं ती म्हणजे सीएनजी गॅसची. नाशिक शहरात सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे चार रुपयांची मोठी वाढ करण्यात आलीयं. यामुळेच आता सीएनजी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅस दरात मोदी सरकारकडून सततची दर वाढ करण्यात येत आहे. सीएनजी गॅस दर वाढत असल्याने वाहन चालकांना मोठा फटका याचा सहन करावा लागतो आहे. 92 रुपये वरून नाशिकमध्ये आता सीएनजी गॅस 96 रुपयांवर पोहचला असल्याने वाहनधारक संतप्त झाल्याचे चित्र बघायला मिळते आहे.
नैसर्गिक वायूच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून राज्याचे मुख्यमंत्री सत्कार स्वीकारण्यात व विविध सणांच्या आनंदोत्सवात व्यस्त आहे. वाढती महागाई, अतिवृष्टीने झालेले पिक नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई व नागरिकांच्या इतर जिवंत प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अंबादास खैरे यांनी केली.