Nashik Knife Attack : रागाच्या भरात तरुणाचा रेल्वे अधिकाऱ्यावर चाकू हल्ला, नांदगाव रेल्वेस्टेशनवरील घटना
Nashik Knife Attack : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) नांदगाव रेल्वे स्टेशनवरील (Nandgoan Railway Station) आरपीएफ अधिकाऱ्यावर माथेफिरू तरुणाने चाकू हल्ला (Knife attack) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Nashik Knife Attack : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) नांदगाव रेल्वे स्टेशनवरील (Nandgoan Railway Station) आरपीएफ अधिकाऱ्यावर एका माथेफिरू तरुणाने चाकू हल्ला (Knife attack) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांना या तरुणास अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
सुकेश तिरडे असे हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी साडे नऊच्या सुमारास नांदगाव रेल्वे स्थानकावर सदर तरुणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यास आरपीएफ अधिकाऱ्याने ताब्यात घेऊन चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात आणले. यावेळी तरुणाने अचानक कर्तव्यावर असलेल्या आरपीएफ अधिकारी डी के तिवारी यांच्यावर चाकूने हल्ला केला. विशेष म्हणजे अधिकाऱ्यावर हल्ला केल्यानंतर त्याने स्वतःवर देखील वार करून घेतला.
दरम्यान या हल्ल्यात आरपीएफ अधिकारी तिवारी हे गंभीर जखमी असून त्यांना मालेगावच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. रेल्वे सुरक्षा बलच्या पोलीस अधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यातच घडलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान हल्ला करणारा गोंदिया येथील राहणारा असून घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
राग आल्याने हल्ला
सकाळची वेळ होती. सर्व अधिकारी कामावर रुजू झाल्यानंतर तिवारी हे फेरफटका मारत असताना त्यांना रेल्वेस्थानकावर हा तरुण संशयास्पद हालचाल करीत असल्याचे आढळून आले. त्यावेळी त्यांनी सावधरीत्या तरुणाचा मागोवा घेऊन त्यास ताब्यात घेतले. तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर तिवारी हे पोलीस स्टेशनमध्ये आले असता तरुणाने चाकू काढून अधिकाऱ्यावर हल्ला केला. तसेच स्वतःच्या गळ्यावर व पोटावर चाकूने वार करून घेतले. संशयास्पद तरुण रेल्वे स्थानकावर फिरत असल्याने त्याची चौकशी केली म्हणून राग आल्याने हल्ला केल्याची रेल्वे सुरक्षा अधिकाऱ्यांची माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या :
MP Hemant Godse : नाशिकचे खासदार हेमंत गोडसेंनी 'का' निवडला शिंदे गट, वाचा गोडसेंचा राजकीय प्रवास
Nashik Crime : चोरट्यांची कमालच! वायफायद्वारे पळवली इलेक्ट्रिक कार, नाशिक पोलिसांनी 'असा' लावला शोध