Nashik Crime : चोरट्यांची कमालच! वायफायद्वारे पळवली इलेक्ट्रिक कार, नाशिक पोलिसांनी 'असा' लावला शोध
Nashik Crime : नाशिक (Nashik) येथून वायफायद्वारे (Wifi) चोरी गेलेली 35 लाख रुपये किमतीची इलेक्ट्रिक कार (Electric Car) शोधण्यात पोलिसांना (Nashik Police) यश आले आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहराजवळील पळसे येथून दहा दिवसांपूर्वी चोरीस गेलेली 35 लाख रुपये किमतीची इलेक्ट्रिक कार (Electric Car) शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. राजस्थानच्या चित्तोडगढ येथून हि कार शोधून काढली असून विशेष म्हणजे या कारची चोरी वायफाय द्वारे (Wifi Theft) करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
नाशिक तालुक्यातील (Nashik taluka) पळसे येथून (दि.09 जुलै) रोजी पांडुरंग एखंडे यांच्या मालकीची इलेक्ट्रिक फॉर्च्युनर कार अज्ञात चोरट्यांनी चोरल्याची घटना घडली होती. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पथक नेमण्यात आले होते. माहितीच्या आधारे पथकाने तपास केला असता ही कार राजस्थानमधील चित्तोडगढ परिसरात असल्याचे समजले. तातडीने स्थानिकी पोलिसांशी संपर्क करून तेथील पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान भंडारी या पुलाजवळ हाती लागल्याचे समजले. नाशिक गुन्हे शोध पथकाने राजस्थान गाठून हि कार संशयित सावळाराम बाबूलाल बिश्नोई यांच्याकडे असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान सदर संशयितासह नाशिक गुन्हे शोध पथकाने कार ताब्यात घेत नाशिक गाठले. मात्र या प्रकरणातील मुख्य संशयित मुकेश खिलेरी आणि सुरेश खिलेरी हे दोघे फरार झाले आहेत. या दोघांनीच कार वायफायद्वारे चालू करून पाळ्या केले होते. त्यामुळे घटनेचा उलगडा झाला मात्र या प्रकरणातील मुख्य संशयित पसार असल्याने गुन्हे शोध पथक त्यांच्या मागावर आहे. हे दोघे सापडल्यास इतर गुन्हे उकल होण्याची शक्यता असून वायफाय द्वारे कारची चोरी हे पोलिसांसमोर आव्हानच असल्याचे समजते.
असा लागला कारचा तपास
पळसे येथून मुकेश आणि सुरेश खिलेरी या दोघांनी लॅपटॉपच्या वायफायद्वारे कार सुरू करीत पोबारा केला होता. हे दोघे पिंपळगाव, चांदवड येथील टोलनाका टाळण्यासाठी त्यांनी निफाडमार्गे धुळे गाठल्याची माहिती गुन्हे शोध पथकाच्या तपासात पुढे आली. या आधारे गाडीची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी मध्य प्रदेशालगतच्या पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना दिली असता, ही गाडी राजस्थानच्या दिशेने गेल्याची समजले. राजस्थान पोलिसांची संपर्क केल्यावर कार चित्तोडगढ पोलिसांच्या नाकाबंदीत मिळून आली. इलेक्ट्रिक कारची चोरी थेट लॅपटॉपच्या वायफायद्वारे चोरी होणे गंभीर बाब असून याबाबत पोलिसांचा सखोल तपास सुरू आहे. यातील मात्र मुख्य संशयितांचा शोध सुरू असून वाहन चालकांनीही इलेक्ट्रिक कार घेतल्यानंतर काळजी घेणे आवश्यक असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी सांगितले.