Trimbakeshwer Shravani Somwar : श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन पहाटे चार वाजेपासून तर नाशिकहून दर दोन मिनिटाला बस
Trimbakeshwer Shravani Somwar : श्रावणात (Shravan) त्र्यंबकेश्वर मंदिर (Trimbakeshwer) दर्शनासाठी पहाटे चार वाजेपासून उघडण्यात येणार असून नाशिकहून (Nashik) दर दोन मिनिटाला बसेस नियोजन करण्यात आले आहे.

Trimbakeshwer Shravani Somwar : श्रावणात (Shravan) प्रत्येक सोमवारी त्र्यंबकेश्वर देवस्थानात (Trimbakeshwer Mandir) दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रत्येक सोमवारी मंदिर पहाटे चार वाजताच दर्शनासाठी उघडण्यात येणार आहे. तर बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी नाशिकहून (Nashik) दर दोन मिनिटाला बसेस नियोजन करण्यात आले आहे. शिवाय त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात श्रावणात विविध धार्मिक कार्यक्रमांस भाविकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे वर्षभर देशाचा विविध भागातून भाविकांचा राबता असला तरी श्रावणात (Shravani Somvar) मात्र भाविकांच्या संकेत नेहमीपेक्षा अधिक वाढ होते. त्यामुळे श्रावणात वाढणाऱ्या गर्दीचे नियोजन देवस्थानला करावे लागते. रांगेत उभे असलेल्या प्रत्येक भावी कला दर्शन होईल, त्यांना कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही. त्यांची गैरसोय होणार नाही, याकडे देवस्थानकडून लक्ष देण्यात येत असते. त्या दृष्टीने अनेक व्यवस्था यंदा देवस्थानकडून मंदिराच्या आवारात करण्यात आले आहेत.
दर्शनात कोणत्याही प्रकारचा अडथळे येऊ नये, यासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीने श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी उघडण्याची वेळ पहाटे पाच ते रात्री नऊ अशी करण्यात आली आहे. परंतु श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविकांची संख्या अधिक वाढत असल्याने मंदिर पहाटे चार वाजताच उघडण्यात येणार आहे. त्र्यंबक शहरातील स्थानिकांना मंदिर उघडल्यापासून सकाळी 11 पर्यंत तसेच सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत दर्शन घेता येईल स्थानिकांनी दर्शनाचे त्यांना स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. स्थानिकांना उत्तर महाद्वारातून प्रवेश दिला जाईल. शासकीय निमशासकीय कर्मचारी तसेच इतर कोणत्याही अति महत्त्वाच्या व्यक्तींना पूर्वनियोजित लेखी राजशिष्टाचार असल्याशिवाय व्हीआयपी दर्शन दिले जाणार नाही.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरमध्ये 800 पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. श्रावणी सोमवार निमित्त ग्रामीण पोलिसांची फौज येथे असेल तर श्रावणी सोमवारी बंदोबस्त अधिक वाढ केली जाईल. यंदा तिसरा सोमवार वगळता इतर दिवशी 50 हजार ते एक लाख 22 त्र्यंबकेश्वरला येण्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वाहन पार्किंगचेही नियोजन सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
नाशिकहुन दोन मिनिटाला बस
राज्य महामार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाने श्रावण महिन्यासाठी प्रवशांच्या सेवेसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर दरम्यान जादा बसेसचे नियोजन केले आहे. नाशिकहुन दर दोन मिनिटाला त्र्यंबकेश्वर साठी बसेस सोडण्यात येणार आहे. तिसऱ्या श्रावणी सोमवारी होणाऱ्या गर्दीचा अंदाज घेत त्या दिवशी सर्वाधिक 350 बसेस त्र्यंबकेश्वर साठी सोडण्यात येणार आहेत. पहिल्या दुसऱ्या आणि चौथ्या श्रावणीसमोरील त्र्यंबकेश्वरसाठी पन्नास जादा बस सुटतील. तिसऱ्या श्रावण सोमवारी 250 सोडण्यात येतील. जिल्ह्यातील सर्व आगारामधून सीबीएस बस स्थानकांपर्यंत बस सेवा उपलब्ध असेल तेथून त्र्यंबकेश्वर पर्यंतचा प्रवास भाविकांना बसने करता येईल अशी माहिती वाहतूक अधिकारी कैलास पाटील यांनी दिली.























