(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Shivsena : नाशिकमध्ये शिवसेना वर्धापन दिनावरून 'सामना', दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन, कशी आहे तयारी?
Nashik Shivsena : नाशिकमध्ये शिवसेना वर्धापन दिनानिमित्त शहर भगवेमय झाले असून दोन्ही गटाकडून तयारी करण्यात आली आहे.
Nashik Shivsena : शिवसेनेच्या (Shivsena) इतिहासात पहिल्यादांच उद्या होत असलेला शिवसेनेचा वर्धापन (Shivsena Anniversary) दिनाचा सोहळा वेगवगेलत्या स्वरूपात पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत शिवसेनेचा वर्धापन दिनाचा एकच सोहळा होत होता. मात्र यंदा शिवसेनेचे दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) शहर भगवेमय झाले असून दोन्ही गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे कोण सर्वात भारी असा जंगी सामना वर्धापन दिनाला नाशिकमध्ये पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून नाशिकमध्ये शिवसेना (Nashik Shivsena) आणि ठाकरे गटात वितुष्ट पाहायला मिळत आहेत. सुरवातीचे अनेक महिने वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले. या दरम्यान अनेक हमरीतुमरी देखील गोष्ट आली होती. मात्र नंतरच्या काळात हा वाद काहीसा कमी झाला. त्यातच नाशिक शहरात शिवसेनेचे दोन मध्यवर्ती कार्यालय उभी राहिली. संजय राऊत (Sanjay Raut) ज्या ज्या वेळी नाशिकमध्ये ता त्या वेळी काही ना काही वाद उफाळून आला. आता शिवसेनेचा वर्धापन दिन काही तासांवर येऊन ठेपला असून यासाठी देखील दोन्ही गट जोरदार शक्ती प्रदर्शनाच्या तयारीत असल्याचे चित्र आहे.
नाशिक शहरात पुन्हा एकदा शिवसेना आणि ठाकरे गटाच्या धुमश्चक्री चे वारे पुन्हा एकदा वाहू लागली आहे. काही तासांवर येऊन ठेपलेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाची शहरात जय्यत तयारी सुरू असून दोन्ही गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन होणार हे आतापर्यंतच्या तयारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे वर्धापन दिनाच्या निमित्ताने दोन्ही गटाकडून ठिक ठिकाणी भगव्या पताका, झेंडे लावण्यात आले असून शहर भगवेमय झाल्याचे चित्र आहे. शिवसेना आणि ठाकरे गट आपापले सोहळे करणार आहेत. शिवसेनेचे आमदार आणि नेते यासाठी कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे, यंदाचा वर्धापन दिन हा आंनदोत्सव म्हणून साजरा करण्याचे आदेश उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याआधीच त्यांच्या जिल्हाप्रमुखांना दिले आहेत. शिवसेनेच्या इतिहासांत पहिल्यांदा असे दोन वर्धापन दिन साजरे केले जाणार आहेत.
इतिहासांत पहिल्यांदा दोन वर्धापन दिन
उद्धव ठाकरे यांच्याशी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काडीमोड घेतला आणि शिवसेनेची सर्वच गणितं बदलून गेली. एकनाथ शिंदे यांना शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मिळाल्यानंतरही ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला जातो. याच शिवसेनेचा उद्या 19 जूनला वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनाची तयारी ठाकरे गटाकडून आधीच करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एकानाथ शिंदे आणि त्यांचे आमदारांनी देखील वर्धापन दिनाची जोरदार तयारी केली आहे. गेल्या वर्षी दसरा मेळावे देखील दोन झाले होते. उद्धव ठाकरे यांचा मेळावा हा शिवाजी पार्कवर तर एकनाथ शिंदेंचा मेळावा हा बीकेसीवर पार पडला होता.
कार्यकर्ते शिवसेनेशी एकनिष्ठ
दरम्यान शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे फलक संपूर्ण नाशिक शहरात लावण्यात आले आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्स पैकी त्यातील काही फलक हवेने रस्त्यावर पडले होते. याच मार्गावरून जात असलेल्या शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी देवेंद्र पाटील यांनी बघितले. त्यांनी तात्काळ गाडी थांबवून ते बॅनर उचलून एका बाजूला ठेवले. त्या बॅनरवर स्व.हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो असल्याने आपण असे केले, असे पाटील यांनी सांगितले. एकीकडे दोन्ही गटात वाद असताना मात्र कार्यकर्ते आजही जोमाने शिवसेनेला वाढविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचे आणि शिवसेनेविषयीची तळमळ दाखवत असल्याचे दिसून येत आहे.