Nashik Vani : सप्तशृंगीच्या वणीचं ट्रॉमा केअर सेंटर धूळखात, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री आणि विधानसभा उपाध्यक्षांचा मतदारसंघ
Rohit Pawar : नाशिकच्या (Nashik) वणी ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरची इमारत दहा वर्षांपासून धूळ खात पडलेली आहे.
Saptshrungi Gad : तब्बल 2 कोटी 90 लाख रुपये खर्चून उभे केलेले नाशिकच्या (Nashik) वणी ग्रामीण रुग्णालयातील ट्रॉमा केअर सेंटरची (Trauma Care Center) इमारत गेल्या 10 वर्षांपासून धूळ खात पडलेली आहे. ट्रॉमा केअर सेंटरची मंजुरी नाही, म्हणून तज्ञ वैद्यकीय अधिकारी व त्यांची टीम नाही. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना वेळीच उपचार मिळत नसल्याने रुग्णांना नाहक प्राण गमवावे लागत आहे. विशेष म्हणजे केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्ष यांचा (Narhari Zirwal) हा मतदारसंघ असून अशा मतदारसंघात सुविधेची वानवा असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
नाशिक - सापुतारा महामार्गावर (Nashik Saputara Highway) असलेल्या वणीच्या आसपास होणारे अपघात लक्षात घेता जखमी रुग्णांवर तातडीने उपचार होऊन त्यांचे प्राण वाचावे, यासाठी आदिवासी विभागाकडून 2013 यावर्षी 'ट्रॉमा केअर सेंटर' ला मंजुरी मिळाली. 2016 ला सुमारे 2 कोटी 90 लाख रुपये खर्च करून ग्रामिण रुग्णालयाच्या आवारात 'ट्रॉमा केअर सेंटर' च्या इमारतीचे कामही पूर्ण करण्यात आले. मात्र ट्रॉमा केअर सेंटर लागणारा तज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आलेला नाही. म्हणून ही इमारत शोभेची बाहुली बनली आहे. वणी ग्रामीण रुग्णालय प्रशासन व स्थानिक ग्रामस्थ यांच्याकडून वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करण्यात आले. मात्र या पत्र व्यवहाराची दखल न घेतल्याने सुमारे 7 ते 8 वर्षांपासून ही इमारत धूळ खात पडून आहे. केवळ कोविड काळात या इमारतीचा उपयोग झाला आहे.
नुकत्याच सप्तशृंगी गडावर (Saptshrungi Gad) बस दरीत कोसळून झालेल्या अपघातानंतर (Nashik Bus Accident) वणी ट्रॉमा केअर सेंटर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या दुर्घटनेतील सर्वच रुग्णांना 'ट्रॉमा केअर सेंटर' सुरू नसल्याने नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवावे लागले. या परिसरातील रस्त्यांवर नेहमीच वर्दळ असते. मोठ्या बाजार समित्या देखील आहेत. त्यामुळे अपघात नित्याचेच घडत असतात. पण जखमींना वेळेत उपचार उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना प्राण गमविण्याची वेळ येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. वास्तविक पाहता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा मतदारसंघ असतांना फक्त राजकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे वणीचे ट्रॉमा केअर सेंटरची इमारत पडून असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
परिसरात अपघातांची मालिका सुरूच
दरम्यान ट्रॉमा केअर सेंटर सुरू झाल्यास या ठिकाणी 5 तज्ञ वैद्यकीय अधिकारी असतील, त्यात ऑर्थपेडिक सर्जन, अँनास्थेटिक तसेच 7 परिचारिका आणि 5 कर्मचारी या बरोबरोच अत्याधुनिक वैद्यकीय साहित्य मिळणार असल्याने जखमींवर तात्काळ इलाज होऊन त्यांचे प्राण वाचण्यास मदत होणार असल्याने वणीचे ट्रॉमा केअर सेंटर लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. तसेच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या मतदार संघातील सुमारे 2 कोटी 90 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेली ट्रॉमा केअर सेंटरची इमारत धूळ खात पडून आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर अपघातात होतात. रुग्णांना प्राण गमवावे लागतात. तात्काळ ट्रॉमा केअर सेंटर सुरू केल्यास तातडीने उपचार मिळून रुग्णांना जीव गमवावा लागणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या :