(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Shinde Gat Office : नाशिकमध्ये शिंदे गटाचे पहिले कार्यालय, उद्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते उदघाटन
Nashik Shinde Gat Office : नाशिकमध्ये (Nashik) बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं आणि शिंदे गटाचं पहिलं संपर्क कार्यालय सुरू करण्यात आल आहे.
Nashik Shinde Gat Office : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटाला बाळासाहेबांची शिवसेना (Shivsena) हे नाव मिळाल्यानंतर नाशिकमध्ये (Nashik) पक्षाचा पहिलं कार्यालय सुरू करण्यात आला आहे. या कार्यालयाचे उदघाटन उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून आता नाशिक शहरात शिंदे गटाला आणखी बुस्ट मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेमध्ये दोन गट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) दोन पक्षाला वेगवेगळे नाव दिलेले आहेत. आणि एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिल्यानंतर याच नावाचं मुंबईनंतर (Mumbai) नाशिकमध्ये पहिलं कार्यालय स्थापन करण्यात आलेल आहे. बाळासाहेबांची शिवसेना नाशिक कार्यालय हे भव्य असं कार्यालय आहे. नाशिक शहरातील जिल्हा परिषदेच्या जवळ खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाच्या बाजूलाच उभ करण्यात आलेल आहे. विशेष याच रस्त्यावर शालिमार परीसरात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मध्यवर्ती कार्यालय आहे.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या नाशिक दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते शिंदे गटाच्या मुंबई बाहेरील पहिल्या वहिल्या कार्यालयाचे उदघाटन होणार आहे. हे कार्यालय पाहिलं तर प्रवेशद्वारावरच बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर आणि वाघाचे चित्र लावण्यात आलेले आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचं आणि शिंदे गटाचं हे पहिलं संपर्क कार्यालय आहे, ज्याची बांधणी नाशिक मध्ये झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या हस्ते या पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. प्रवेशद्वारावरच बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यात आलेली आहे. बरोबर वाघाचं इथे चिन्ह देखील आहेत. एकूणच या कार्यालयाचा जर आपण आढावा घेतला तर एक कॉर्पोरेट लूक या ऑफिसला देण्यात आलेला आहेत. इथेच बाजूला नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचे देखील कार्यालय आहे आणि याच कार्यालयाला लागून हे ऑफिस सुरू करण्यात आलेले आहे.
दरम्यान शिंदे गटाच्या नाशिक कार्यालयात संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख त्याचबरोबर महानगर प्रमुख यांचे कार्यालय आहेत. इथूनच ह्या सर्व पदाधिकाऱ्यांचा कारभार हा चालणार आहे. कार्यालयाच्या एका बाजूला कार्यालयीन स्टाफसाठी स्वतंत्र जागा तयार करण्यात आली आहे. याच ठिकाणाहून सर्व सोशल मीडियाची काम हँडल केली जातील आणि ती सोशल मीडियामध्ये प्रसार माध्यमांमध्ये वितरित केल्या जातील, असे दिसते आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेला नेमका कसा प्रतिसाद मिळतो हे बघणे तेवढेच महत्त्वाचा असून भविष्यामध्ये नाशिक शहरांमध्ये, जिल्ह्यामध्ये आपली फळी निर्माण करण्याचं एक मोठं आव्हान या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे.