एक्स्प्लोर

Jalgaon News : जळगाव दूध संघात कोट्यवधींचा अपहार, आठ दिवसांत तक्रार दाखल करणार, आमच्याकडे सगळे पुरावे : आमदार मंगेश चव्हाण

Jalgaon News : जळगाव दूध संघात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला असल्याचे आमदार मंगेश चव्हाण म्हणाले आहेत.

Jalgaon News : जळगाव दूध संघा (Jalgaon Milk) झालेल्या अपहाराला खडसे परिवार जबाबदार असून त्याचे सर्व पुरावे आपल्याकडे असून येत्या आठ दिवसांत आपण या संदर्भात पोलिसात तक्रार देणार असल्याचा इशारा विद्यमान अध्यक्ष आमदार मंगेश चव्हाण यांनी दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जळगाव दूध संघात मागील काळात मंदाताई खडसे (Mandatai Khadse) अध्यक्ष पदावर असताना दूध संघात कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला असल्याच्या तक्रारी आपण केल्या होत्या. या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आले असून या संदर्भात आपण पुराव्यांनिशी माध्यमाच्या समोर आणणार असून त्या संदर्भात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा विद्यमान अध्यक्ष आ मंगेश चव्हाण यांनी दिल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. 

दूध संघात दीड कोटी रुपयांचा अपहार

जळगाव (Jalgaon) जिल्हा दूध संघात काही दिवसांपूर्वी संचालक मंडळ बरखास्त होऊन शिंदे फडणवीस सरकारने प्रशासक मंडळ नेमलं होतं. प्रशासक मंडळाने दूध संघात सुमारे दीड कोटी रुपयांचा लोणी आणि दूध पावडरचा अपहार झाल्याचं समोर आलं. यानंतर दूध संघ प्रशासनाने शहर पोलीस ठाण्यात अपहाराची तक्रार दाखल केली होती. आता आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavhan) हे स्वतः खडसे कुटुंबीयांविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे ते म्हणाले आहेत. आमदार मंगेश चव्हाण म्हणाले की, जळगाव दूध संघ घोटाळा प्रकरणी येत्या आठ दिवसांत आपण पोलिसात तक्रार देणार असून खडसे परिवारामुळेच दूध संघात आर्थिक अपहार झाला आहे. जळगाव दूध संघात नुकतीच काही कर्मचाऱ्यावर निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली होती. 

दूध संघाच्या हिताच्या दृष्टीने अतिरिक्त कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला 

या संदर्भात आ मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे की, खडसे परिवाराने गरज नसताना आपल्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी त्यांना दूध संघात घेतले होते. त्याचा अतिरिक्त आर्थिक भार हा दूध संघावर होत होता. अनेक कर्मचारी तर कधीही दूध संघात आले नव्हते. अशा कर्मचाऱ्यांना ही पगार मिळत होता, मात्र दूध संघ वाचवायचा असेल तर अनावश्यक होणारा खर्च टाळला जावा, यासाठी अनेक खर्चात कात्री लावण्यात आली आहे. त्यात अतिरिक्त कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दूध संघाच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे. यात राजकीय हेतू नसल्याचं मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे. यातील वाचलेली रक्कम आम्ही थेट दूध उत्पादकांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याचा परिणाम म्हणून दूध संघाचे उत्पन्न वाढले आहे, असंही आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटल आहे. 

दरम्यान येत्या आठ पंधरा दिवसात पुराव्या निशी आम्ही पोलिसात जाणार असल्याने खडसे परिवाराची भागमभाग चालू होणार असल्याचा इशाराही आ. मंगेश चव्हाण यांनी दिला आहे. 

संबंधित बातमी

Jalgaon Dudh Sangh : जळगाव दूध संघाच्या अध्यक्षपदी भाजप आमदार मंगेश चव्हाण, पदभार स्वीकारताच खडसेंचा फोटो हटवला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतलीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP MajhaNashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पणUjjwal Nikam on Vidhan Sabha Elections  : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget