एक्स्प्लोर

Jalgaon Dudh Sangh : जळगाव दूध संघाच्या अध्यक्षपदी भाजप आमदार मंगेश चव्हाण, पदभार स्वीकारताच खडसेंचा फोटो हटवला

Jalgaon Dudh Sangh : जळगाव जिल्हा दूध संघाच्या (Jalgaon Dudh Sangh) अध्यक्षपदी भाजपा आमदार मंगेश चव्हाण ( MLA Mangesh Chavan) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Jalgaon Dudh Sangh : अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या जळगाव जिल्हा दूध संघाच्या (Jalgaon Dudh Sangh) अध्यक्षपदी भाजपा आमदार मंगेश चव्हाण ( MLA Mangesh Chavan) यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या ( BJP-Shinde Group) शेतकरी सहकार पॅनलने एकनाथ खडसेंच्या (Eknath khadse) गटाचा पराभव केला होता. विशेष म्हणजे या निवडणुकीत एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदा खडसे यांनी पराभवाचा धक्का बसला आहे. दरम्यान, जळगाव दूध संघाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याबाबत जोरदार चर्चा सुरु होती. अखेर आमदार मंगेश चव्हाण हे दूध संघाचे अध्यक्ष झाले आहेत.

भाजप-शिंदे गटाच्या विजयात मंगेश चव्हाण यांची महत्त्वाची भूमिका

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाच्या शेतकरी सहकार पॅनलने 16-4 असा विजय मिळवला होता. एकनाथ खडसेंच्या गटाला केवळ चार जागांवरच समाधान मानावं लागलं होते. त्यानंतर अध्यक्ष कोण होणार असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर आज भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्यानं सर्व चर्चांना पूर्ण विराम मिळाला आहे. आमदार मंगेश चव्हाण हे एकनाथ खडसे यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. जळगाव जिल्हा दूध संघावर तब्बल सात वर्षे एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाची सत्ता होती. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटाने एकत्र येत एकनाथ खडसेंचा दारुण पराभव केला होता. या निवडणुकीत भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळं त्यांची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.

दूध संघातील एकनाथ खडसेंचा फोटो हटवला, मंत्री महाजनांची टीका

भाजप आमदार मंगेश चव्हाण दूध संघाच्या अध्यक्षपदी विराजमान होताच जिल्हा दूध संघातील एकनाथ खडसे यांचा फोटो काढण्यात आला आहे. त्यामुळं तब्बल सात वर्षापासून एकनाथ खडसे यांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा दूध संघावर आता भाजप-शिंदे गटाची सत्ता आली आहे. जिल्हा दूध संघात अध्यक्षांच्या दालनात असलेल्या फोटोवरून मंत्री गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. जिवंतपणी कसं काय कोणी कोणाचा फोटो लावू शकतो. प्रोटोकॉलनुसार महापुरुषांचे फोटो, मुख्यमंत्र्यांचा फोटो आपण या ठिकाणी लावू शकतो. मात्र एकनाथ खडसे यांचा फोटो या ठिकाणी कसा काय? असा सवालही महाजन यांनी उपस्थित केला. त्यामुळं संचालकांनी सांगितल्यानुसार खडसेंचा फोटो काढण्यात आला आहे. या फोटोची आम्हाला आता काही गरज भासत नाही असेही मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या:

Eknath Khadse: जळगाव जिल्हा दूध संघावर सात वर्षानंतर सत्तांतर, खडसेंच्या गडाला सुरुंग लावत भाजप-शिंदे गटाची एकहाती सत्त्ता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
Embed widget