एक्स्प्लोर

Nashik Satptshrungi Gad : सावधान! सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाताय? दागिने, पर्स, पैसे सांभाळून ठेवा.... गडावर चोरांची टोळी सक्रिय

Nashik Satptshrungi Gad : सप्तशृंगी देवी (Saptshrungi Devi) दर्शनासाठी मंगळवार, रविवार, शुक्रवार रोजी मोठ्या प्रमाणावर भाविक गडावर दाखल होत आहेत.

Nashik Satptshrungi Gad : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उत्तर महाराष्ट्राचे दैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगी (Saptshrungi Gad) गडावर मे महिन्याची सुट्टीची पर्वणी साधत लाखो भाविक सप्तशृंगी देवी (Saptshrungi Devi) दर्शनासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळे मंगळवार, रविवार, शुक्रवार या दिवशी मोठ्या प्रमाणावर भाविक गडावर दाखल होत आहेत. त्यामुळे गडाला यात्रेचे स्वरुप प्राप्त होत आहे. मात्र अशातच चोरटे आपला हात साफ करत असल्याचे दिसून येत आहे.

बारमतीहून आलेल्या महिलेचा तीन तोळे वजनाचा सोन्याचा हार चोरला

सप्तशृंगी देवी (Nashik) दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गडावर गर्दी असते. मात्र यंदा हे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. जळगाव, धुळे, पुणे, नाशिक, गुजरात मध्य प्रदेश, मुंबई (Mumbai) व इतर ठिकाणच्या भाविकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. याच गर्दीचा फायदा महिला चोरांच्या टोळी कडून घेतला जात असून एसटी बसमध्ये चढताना, गडावर फूल प्रसाद खरेदी करताना, गडावर जात असताना, दर्शनबारीत, देवीच्या गाभाऱ्यात चोरीचे प्रकार घडत आहेत. दरम्यान कालच  एका बारामतीहून आलेल्या भाविक महिलेच्या पर्समधील 87 हजारांचा तीन तोळे वजनाचा सोन्याचा तारणहार चोरुन नेल्याची घटना घडली आहे. ही महिला आपल्या कुटुंबासह सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी आलेली होती. देवीचे दर्शन घेऊन गाभाऱ्याबाहेर येऊन रोपवेकडे जात असताना कोणीतरी चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन मधून सोन्याचा राणीहार लंपास केला आहे. 

महिलांमध्ये भीतीचं वातावरण

एकीकडे मागील काही दिवसांपासून एसटीच्या दरात महिलांसाठी सूट देण्यात आल्यामुळे अर्धे तिकीट झाल्यापासून मोठ्या प्रमाणात महिला महामंडळ बससेवेच्या माध्यमातून प्रवास करत आहेत. त्यामुळे नाशिकहून सप्तशृंगी गडासाठी सुटणाऱ्या बसेसमधून अनेक महिला प्रवास करत असतात. अशावेळी बसमध्ये चढत असताना किंवा बसमध्ये असताना, त्याचबरोबर गडावर बसमधून उतरत असताना चोरीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे महिला वर्गामध्ये देखील भीतीचं वातावरण पसरले आहे. एकीकडे देवीच्या दर्शनासाठी महिलावर्ग नटून-थटून येत असताना दुसरीकडे चोरट्यांची टोळी मात्र हात साफ करताना निदर्शनास येत असल्याने खळबळ उडाली आहे. 

सप्तशृंगी देवी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर चोरीचे प्रकार होत आहेत. अशा घटनांमधून सोन्याचे मंगळसूत्र, चैन, कानातले, पर्स मधून पैसे चोरणे, पुरुषांचे पाकीट, मोबाईल फोन चोरणे असे प्रकार घडत आहेत. हा प्रकार आठ ते दहा महिला सक्रिय चोरांच्या टोळीकडून होत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिसांसमोर या टोळीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या सक्रिय चोर टोळीमध्ये सहा ते सात महिलांचा समावेश असल्याचे निदर्शनास आले आहे, त्यामुळे हा प्रकार थांबवणे गरजेचे आहे. याबाबत कळवण पोलिसांना कळवले असून पोलिसांचा अतिरिक्त फौज फाटा देखील या ठिकाणी तैनात असायला हवा, अशी मागणी सप्तशृंगी गडावरील नागरिकांनी केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Advertisement
metaverse

व्हिडीओ

CM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Embed widget