MLA Chhgan Bhujbal : 'शिवसेना संपावी असं कधीच वाटणार नाही', नाशिकमध्ये छगन भुजबळ यांनी व्यक्त केली भावना
MLA Chhgan Bhujbal : शिवसेना (Shivsena) संपावी अस कुठल्याच शिवसैनिकाला अस वाटणार नाही, अशा शब्दात नाशिकचे (Nashik) माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
MLA Chhgan Bhujbal : शिवसेनेत (Shivsena) पहिल्या दिवसांपसून होतो, माझ्याबरोबरचे अनेक जण आजही शिवसेनेत आहेत. माझ्या मनाला अस कधीच वाटणार नाही की शिवसेना संपावी, किंवा कुठल्याच शिवसैनिकाला अस वाटणार नाही, अशा शब्दात नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
राजकीय सत्तानाट्यानंतर छगन भुजबळ हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले कि मी माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेतून झाली आहे. माझ्यासारख्या नेत्याला कधीच वाटणार नाही की शिवसेना संपायला पाहिजे. सध्या राज्यात भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 'राज्यातील नव्या सरकार बाबत बोलताना नवीन काही होत असेल तर आम्ही वाईट बोलणार नाही' असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
तसेच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या कामांना ब्रेक दिला. यावर भुजबळांना विचारले असता ते म्हणाले कि, नाशिक जिल्ह्यात नियोजन समिती अंतर्गत सगळ्यांना समान निधी वाटप केला होता, मात्र आता तो रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नवीन पालकमंत्री आल्यावर निर्णय होईल, आता त्यावर स्टे का हे मला माहित नाही. असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
नाशिकवर सध्या पाणी कपातीचे संकट गडद असल्याने यावर देखील भुजबळाने चिंता व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात पाऊस सुरू असला तरी नाशिक मध्ये अजून पाऊस सुरू झालेला नाही. जिल्ह्यात फक्त दीडशे मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अनेक ठिकाणी पेरण्या झाल्या तर मात्र अनेक ठिकाणी पेरण्या रखडले असल्याचे त्यांनी सांगितले. तर नाशिकच्या गंगापूर धरणात फक्त 28 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी नाशिककरांना केले. तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या देखील वाढत असून जिल्हातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याचे भुजबळांनी सांगितले.
भुजबळांचा नाशिक दौरा
राष्ट्रवादीचे नेते व माजी पालकमंत्री छगन भुजबळ हे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. येवला मतदार संघात अनेक ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी भुजबळ शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सत्तात्तरांनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांचा आढावा घेण्याबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यावयाची याबाबत चर्चा करणार असल्याचे समजते.