एक्स्प्लोर

Nashik News : आजोबाला वाचविण्यासाठी नातवाने विहीरीत उडी मारली, काळजाचा ठोका चुकविणारं थरारक रेस्क्यू ऑपरेशन 

Nashik News : आजोबा विहिरीत पाय घसरून पडले, त्यांना वाचविण्यासाठी पोहायला न येणाऱ्या नातवाने उडी घेतली.

Nashik News : माणसाच्या संकट काळात कधी कोण देवासारखा धावून येईल हे सांगता येत नाही, अशीच काहीशी घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदोरी (Chandori) येथे घडली आहे. येथील विहिरीत पडलेल्या आजोबा आणि नातवाला वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. घराशेजारी असलेल्या विहिरीत दोघे पडले होते. मात्र आपत्ती व्यवस्थापनसह गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करत दोघांना वाचवले आहे.

निफाड (Niphad) तालुक्यातील चांदोरी परिसरात राहणाऱ्या नाते कुटुंबातील धोंडीराम नाठे हे घराच्या बाजूला असलेल्या विहिरीपासून जात होते दरम्यान त्यांचा तोल गेला आणि ते विहिरीत पडले यावेळी आजोबा आजोबांचा आरडाओरडा ऐकताच जवळच असलेल्या नातू गणेश नाठे यांनी देखील विहिरीत उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडू लागले. इतक्यात विहिरी शेजारून जात असलेल्या स्थानिक ग्रामस्थाला विहिरीतून आवाज येत असल्याने त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता, त्याला धक्काच बसला. त्याने तात्काळ आपत्ती व्यवस्थापनाला माहिती कळवली. आपत्ती व्यवस्थापनाने घटनास्थळी धाव घेत या दोघा आजोबा नातवाला सुखरूपपणे बाहेर काढले आणि सुटकेचा निस्वास सोडला.

चांदोरी गावात गणेश नाठे यांची कुटुंबीय वास्तव्यास आहे यांच्या मळ्यात घराजवळच एक विहीरही आहे. सध्या या विहिरीला भरपूर पाणी आहे. दरम्यान शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गणेश नाठे यांचे आजोबा धोंडीराम नाठे हे विहिरी जवळून जात असताना त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले. गणेश नाठे यांना विहिरीतून आवाज येत असल्याचे लक्षात येताच  त्यांनी आजोबांना वाचवण्यासाठी उडी घेतली. मात्र आजोबा आणि नातू या दोघांनाही पोहता येत नव्हते त्यामुळे ते पाण्यात बुडत होते. याचवेळी या ठिकाणाहून जात असलेल्या रोशन संजय टर्ले यास विहिरीतून आवाज येत असल्याचे ऐकले. तो विहिरीजवळ जातच त्याला हे दोघे बुडत असल्याचे दिसून आले. टर्ले यांनी प्रसंगावधान राखत आपत्ती व्यवस्थापनाला माहिती दिली.

चांदोर येथील आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. एका खाटेला चारी बाजूंनी दोर बांधत ही खाट खाली सोडण्यात आली. आणि रेस्क्यू टीमचे काही कर्मचारी विहिरीत उतरले आणि या दोघांना एक-एक करत खाटेवर टाकतवर काढण्यात आले. या संदर्भातला रेस्क्यू करतानाचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला आहे. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या या कृतीचे चांदोरीसह परिसरात कौतुक केले जात असून यापूर्वी देखील समितीने अनेक ठिकाणी शोधकार्य करत प्रशासनाला मदत केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Shinde Satara Speech : खरी शिवसनेना कुणाची हे सिद्ध झालंय, मुख्यमंत्र्यांचं साताऱ्यात जोरदार भाषणBhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
Embed widget