एक्स्प्लोर

Nashik Girish Mahajan : भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना नाशिकपासून दूर ठेवलं जातंय का? नव्या नेत्यांवर जिल्ह्याची जबाबदारी 

Nashik Girish Mahajan : नाशिकचे (Nashik) संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना भाजपने धक्का दिला आहे.

Nashik Girish Mahajan : नाशिकचे (Nashik) संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना धक्का बसला असून, उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी विजय चौधरी (Vijay Chaudhari) यांच्याकडे, तर नाशिक शहरासह दोन्ही लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांच्याकडे देण्यात आली आहे. याशिवाय मंत्री या नात्याने शासन आणि पदाधिकारी यांच्यातील समन्वयाचे कामही महसूलमंत्री विखे पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी हा संपूर्ण फेरबदल केला असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान आगामी निवडणुकांच्या (Loksabha Election) दृष्टीने भाजप  (BJP) सावध पाऊले टाकत असून त्यानुसार राज्यभरात मोर्चेबांधणीस सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक भाजप पक्षाच्या बदलाचे वारे वाहू लागल्याचे चित्र आहे. आतापर्यंत नाशिकचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना नाशिकपासून पक्षाने दूर ठेवल्याचे बोलले जात आहे. भाजपने आता पक्षाचे सरचिटणीस विजय चौधरी यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राजेंद्र गावित यांच्याकडे नाशिक शहर, तसेच उत्तर नाशिक आणि दक्षिण नाशिकची जबाबदारी देण्यात आली आहे. दोघेही नंदुरबारचे आहेत. विजय चौधरी यांनी यापूर्वी नाशिकचे संघटन बघितले असले, तरी राजेंद्र गावित यांच्यावर प्रथमच जबाबदारी देण्यात आली आहे. आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे राजेंद्र हे बंधू आहेत. 

दरम्यान गिरीश महाजन हे भाजपासाठी उत्तर महाराष्ट्राचे प्रबळ नेते आहेत. उत्तर महाराष्ट्रातही निवडणूक आणि गिरीश महाजन हे समीकरण सर्वश्रुत आहे. प्रभारीपदाची नेमणूक हा भाजप पक्षाचा संघटनात्मक रचनेचा एक भाग आहे. उत्तर महाराष्ट्र निवडणुकांसह विविध गोष्टीचे अधिकार महाजन यांच्याकडेच असून ते पुढेही राहणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.  महाजन हे उत्तर महाराष्ट्राचे संकट मोचक असून त्यांच्या अधिकारात कुठेही फरक झालेला नसल्याचे देखील चौधरी म्हणाले. 

नाशिकचे पालकमंत्रीपद ही नाही

दरम्यान 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भरात आलेल्या भाजपने नाशिकचे जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री म्हणून सोपविली. त्याचबरोबरच संघटनेची सूत्रेही त्यांच्याकडे सोपविली होती. संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची सूत्रे महाजन यांच्याकडे एकवटली होती. मात्र राज्यात महाविकास आघाडीचा तख्ता पालट झाल्यांनतर राज्याचे नवीन मंत्रिमंडळ तयार झाले. त्यावेळी गिरीश महाजन यांच्याकडे सूत्रे येण्याची शक्यता होती. तसेच मंत्रिमंडळ तयार झाल्यानंतर राज्यातील जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदांची नियुक्ती करण्यात येत होती. अशावेळी नाशिकवर सगळ्यांचे लक्ष लागून होते. मात्र पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांना मिळेल असे वाटत असताना पक्षाने धक्कातंत्राचा वापर केल्याने नाशिकचे पालकमंत्रिपद शिंदे गटाच्या दादा भुसे यांच्याकडे गेले. 

नाशिकचे संकटमोचक म्हणून ओळख 

दरम्यान, याआधी महापालिका निवडणुकांची तयारी सरु असताना राज्याचे माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे प्रभारीपद देण्यात आले होते. तयारीतील काही उणीवा लक्षात आल्यानंतर संकटमोचक म्हणून पुन्हा एकदा महाजन यांना नाशिकचे प्रभारी, तर रावल यांना सहप्रभारी करण्यात आले होते. आता मात्र संपूर्ण रचनाच बदलण्यात आली आहे. राज्यातील नऊ मंत्र्यांकडे वेगवेगळ्या महसूल विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात गिरीश महाजन यांच्याकडे अन्य जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.नाशिकची जबाबदारी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आली असून, त्यांनी भाजपाच्या सुकाणू समितीची बैठक घेतली होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget