Ajit Pawar : "माझं अंतर्मन म्हणालं, आपण सिल्वर ओकवर गेलं पाहिजे, म्हणून गेलो"; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण
Ajit Pawar Nashik : शरद पवार साहेबांचे घर आहे, ते तिथे असणारच, त्यांनाही भेटलो, इतर राजकीय चर्चा झाली नाही.
Ajit Pawar Nashik : खातेवाटप जाहीर झाल्यानंतर अजित पवार सिल्वर ओकवर गेले. तब्बल अर्धा तास अजित पवार सिल्वर ओकवर होते. अजित पवारांचं सिल्वर ओकवर जाणं, त्यावेळी शरद पवारही उपस्थित असणं, याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगली होती. अखेर आज नाशकात बोलताना स्वतः अजित पवारांनीच सिल्वर ओकवर जाण्याचं कारण स्पष्ट केलं आहे.
"काल दिवसभर अनेक कामांमुळे दुपारी सिल्वर ओकवर (Silver Oke) जायला जमले नाही, रात्री उशिरा गेलो. माझं अंतर्मन म्हणालं, आपण सिल्वर ओकवर गेलं पाहिजे, म्हणून गेलो. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, कुटुंब कुटुंबांच्या ठिकाणी आहे. सर्वांची भेट घेतली, बोललो.", असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सिल्वर ओक येथील भेटीवर दिलं आहे.
नाशिकमध्ये (Nashik) शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानंतर पहिल्यांदा उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिकमध्ये आले आहेत. सकाळी वंदे भारत एक्सप्रेसच्या मध्यमातून ते नाशिकमध्ये दाखल झाले. यानंतर जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. त्यांनतर शासकीय विश्रामगृहात अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी काल सिल्वर ओकवर जाऊन पवार कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी काय घडलं? याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, काल काकीचं (प्रतिभा पवार) ऑपरेशन झालं, मला दुपारीच जायचं होतं, पण जाता आलं नाही. दुपारी सुप्रियाशी बोललो, त्यानंतर मंत्रालयातील कामे आटोपल्यांनंतर सिल्व्हर ओकला गेल्याचे अजित पवार म्हणाले.
अजित पवार यावेळी म्हणाले की, काल काकींच ऑपरेशन झालं, त्यांच्या हाताला दुखापत झाल्यामुळे काल भेट घेणार होतो. मात्र खाते वाटपाचा निर्णय होत असल्याने मंत्रालयात, विधानभवनात होतो. तिथून निघाल्यानंतर थेट सुप्रिया सुळेंना फोन केला. त्यावेळी सुप्रियाने सांगितले की, मी आता सिल्वर ओकवर निघाले आहे. काम झाल्यावर मी देखील सिल्वर ओक गेलो. त्यामुळे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे आणि कुटुंब कुटुंबाच्या ठिकाणी आहे. आपली भारतीय संस्कृती असून परिवाराला आपण पहिल्यांदा महत्त्व देतो. सिल्वर ओकवर अर्धा तास थांबलो. सर्वांशी भेट घेतली. माझ्या अंतर्मनांन सांगितलं की तिथं गेल पाहिजे, म्हणून मी गेलो, शरद पवार (Sharad Pawar) साहेब तिथं होते, असेही ते म्हणाले.
शरद पवार यांचीही भेट घेतली....
तसेच शरद पवार साहेबांचे घर आहे, ते तिथे असणारच. त्यांनाही भेटलो, इतर राजकीय चर्चा झाली नाही. शरद पवारांनी शिक्षण विभागाला शाळा व्यवस्थेबद्दल पत्र दिले, या संदर्भात चर्चा केली. याबाबत शिक्षण विभागाला कळविण्यात आले असून लवकरच याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यानुसार प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात काय अडचण येतात? या समजून घेतल्या जाणार आहेत. त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल असेही अजित पवार यावेळी म्हणालेतसेच आता महायुतीत आम्ही काम करतो आहोत. मागे काही चुका झाल्या असतील, कोणाच्या तक्रारी असतील तर सुधारल्या जातील. दुजाभाव केला जाणार नाही. सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, मला त्याकडे लक्ष द्याचे नसल्याचे अजित पवार म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Nashik News : नाशिकला आज मंत्र्यांची मांदियाळी, शासन आपल्या दारी कार्यक्रमाला नऊ मंत्र्याची उपस्थिती