एक्स्प्लोर

Eknath Khadse : नाशिकच्या कार्यक्रमात भाजप नेत्यांच्या गर्दीत खडसे एकाकी, तर निमंत्रण पत्रिकेत नावही नाही! 

Eknath Khadse : नाशिकच्या (Nashik) डोंगरे वसतिगृह मैदानावर कालपासून सुरु असलेल्या महानुभाव संमेलनात भाजप (BJP) नेत्यांच्या गर्दीत मात्र एकनाथ खडसे एकाकी पडत असल्याचे चित्र आहे.

Eknath Khadse : नाशिकच्या (Nashik) डोंगरे वसतिगृह मैदानावर कालपासून सुरु असलेल्या महानुभाव संमेलनात (Mahanubhav Sammelan) आज राजकीय नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis), मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) व खान्देशातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची उपस्थिति आहे. दरम्यान भाजप (BJP) नेत्यांच्या गर्दीत मात्र एकनाथ खडसे एकाकी पडत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महानुभाव संमेलन आयोजकांच्या कार्यक्रम पत्रिकेत खडसेंचे नावच नसल्याचे खडसे मंचावर उपस्थित कसे असाही सवाल उपस्थित केला जात आहे. 

नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदानावर भगवान श्री चक्रधर स्वामी यांचे अष्टशताब्दी जन्मोत्सवानिमित्त अखिल भारतीय महानुभाव संमेलन (Akhil Bhartiya Mahanubhav Sammelan) आजपासून सुरु झाले. ते बुधवार (दि 31) पर्यंत तीन दिवस चालणार असून आज पहिल्या दिवशी सकाळी चक्रधर स्वामींच्यां चरमाकीतस स्तनाक स्नान घालण्यात आले. दरम्यान दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन आले असताना दुसरीकडे मंचावर एकनाथ खडसे देखील उपस्थित असल्याचे मंचावर शांतता पसरल्याचे चित्र आहे. 

दरम्यान मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांचा वाद राज्यात सर्वश्रुत आहे. त्यातच शिंदे- फडणविस सरकार स्थापन झाल्यापासून भाजप खान्देशातील मोठे नेते असून असून खडसे यांनी भाजप सोडल्यापासून गिरीश महाजन आणि खडसे यांच्या नेहमीच खटके पडत असतात. त्यामुळे या दोघांचा वाद नेहमीच चर्चेत असतो. शिवाय या दोघांच्या वादाला कारणीभूत हे देवेंद्र फडणवीस असल्याचे खडसे यांनी नाव न घेता अनेकदा राजकीय मंचावर म्हटले आहे. अशातच आज तीनही राजकीय नेते एकाच मंचावर आल्याने पुरता गोंधळ उडाला आहे. 

या संमेलनास उपमुख्यमंंत्री देवेंंद्र फडणवीस उपस्थित असून त्यांच्यासोबत मंत्री गिरीश महाजन हे देखील उपस्थित आहेत. राज्यात पुनश्च सत्तेवर आल्यानंतर त्यांचा हा पहीलाच दौरा असल्याने संयोजक व भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी सज्ज झाले आहेत.  यावेळी संयोजकांतर्फे विविध मागण्या मांडल्या जाणार आहे. त्यात फडणवीस त्यांच्या पदारी काय टाकतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खडसे पडले एकाकी 
दरम्यान दुसऱ्या दिवशीच्या दुपारनंतरचा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर द्वीप प्रज्वलनादरम्यान सर्वच नेते उभे असताना मात्र खडसे एकाच जागेवर बसून होते. त्यामुळे भाजप नेत्याच्या गर्दीत एकनाथ खडसे एकाकी पडल्याचे दिसत होते. शिवाय दीप प्रज्वलन करत असताना फडणविस, खडसे उभे असताना मात्र खडसे बसून होते. तसेच त्यांना कोणी हटकल्याचे दिसले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होते आहे. एकीकडे एकाच मंचावर असताना खडसेंना दुजाभाव भाजपकडून दिला जातोय का? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. 

निमंत्रण पत्रिकेत नावचं नाही!
महानुभाव संमेलन मोठ्या उत्साहात साजरे होत असून या कार्यक्रमासाठी आयोजकांनी निमंत्रण पत्रिका देखील छापली आहे. असे असताना सदर निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पासून ते भाजपच्या अनेक नेत्यांची नावे आहेत. तसेच दादा भुसे यांचे देखील नाव आहे. मात्र पत्रिकेत एकनाथ खडसेंचे नावच नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. निमंत्रण पत्रिकेत नाव नसताना एकनाथ खडसे मंचावर कसे? असा प्रश्नही उपस्थितांनी व्यक्त केला. 

फडणवीस काय बोलणार?
एकीकडे महानुभाव पंथांचे संमेलन असल्याने राजकीय व्यासपीठ नसल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेमके काय बोलतात याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान सदर महानुभाव संमेलन जाहीर झाल्यापासून फडणवीस हे कार्यक्रमांसाठी येणार हे निश्चित होते. त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे नाशिकमध्ये आज दुपारी हजर होऊन कार्यक्रमाला उपस्थित झाले आहेत. दरम्यान सुरवातीला झालेल्या दीपप्रज्वलनातही महाजन-फडणवीस हे उभे असताना खडसे मात्र एकाच जागेवर बसून होते, त्यामुळे यात काय गौडबंगाल आहे हे आयोजकांना देखील कोडेच आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget