Nashik CBI Raid : नाशिकच्या लाचखोर जीएसटी अधिकाऱ्यास न्यायालयात हजर करणार, सीबीआयकडून कोठडीची मागणी
Nashik CBI Raid : नाशिकमध्ये (Nashik) जीएसटी विभागातील (GST Department) लाचखोर अधिक्षकाला आज न्यालायात हजर करणार असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
Nashik CBI Raid : नाशिकमध्ये (Nashik) जीएसटी विभागातील (GST Departement) अधीक्षक आठ हजारांची लाच घेताना सीबीआय एसीबीने (CBI) रंगेहाथ पकडल्याची घटना काल घडली. त्यांनतर या जीएसटीच्या लाचखोर अधिक्षकाला आज न्यालायात हजर करणार असून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. नाशिकच्या सिडको कार्यालयामधून चंद्रकांत चव्हाणके (Chandrakant Chavhanke) यांना अटक करण्यात आली होती.
नाशिकच्या आदिवासी विकास विभागातील कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल (Dineshkumar Bagul) यांना तब्बल २८ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआयने नाशिकमध्ये ही कारवाई केली आहे. जीएसटी विभागातील चंद्रकांत चव्हाणकेला 8 हजार रुपयांची लाच घेताना शुक्रवारी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. अटक झाल्यानंतर रात्री उशिरा पर्यत कारवाई सुरू होती.
नाशिकमध्ये सीबीआयने कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाची ही पहिलीच आणि अतिशय मोठी कारवाई आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने लाचखोरीच्या घटना घडत आहेत. प्राथमिक माहितीनुसार नाशिकमधील वस्तू व सेवा कर विभागाचे कार्यालय आहे. एक राज्य सरकारचे आहे तर दुसरे केंद्र सरकारचे. यातील केंद्र सरकारच्या सीजीएसटी कार्यालयावर सीबीआयने धाड टाकली. या कारवाईमध्ये सीजीएसटी विभागाचा सुप्रिंटेंडंट चंद्रकांत चव्हाणके हाती लागला आहे.
दरम्यान चव्हाणके यांच्या घरीही सीबीआयचे धाडसत्र सुरु असून लाखो रुपयांची रोकड, मालमत्तेचे कागदपत्रे सीबीआय पथकाने जप्त केले आहेत. चव्हाणकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी सिबीआयने कोठडीची मागणी केली असून आज न्यायालयात हजार केले जाणार आहे. दरम्यान चंद्रकांत चव्हाणके यांनी तक्रारदाराचे बंद पडलेले जीएसटी अकाउंट पुन्हा सुरू करण्यासाठी लाच मागीतिली होती. त्यांनतर फोनवर आलेल्या तक्रारीची दखल घेत सीबीआय कारवाई केली.
दरम्यान चव्हाणके यांनाअटक केल्यानंतर त्यांच्या घरांवर धाडसत्र टाकत मुद्देमाल हस्तगत करण्यात येत आहे. या लाचखोर जीएसटी अधिकाऱ्यास आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. चव्हाणके याच्याकडे आणखी मुद्देमाल सापडण्याची शक्यता असल्याने सीबीआय एसीबीने (ACB) त्याच्या अधिक चौकशीसाठी रिमांड मागितला आहे.
लाच घेण्याचे प्रमाण वाढले...!
गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील (Nashik News) लाचेच्या प्रकरणांत (Bribe Case) वाढ झाली आहे. काल आरोग्य विभागाच्या (Health Deaprtment) उपसंचालकांचे लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असताना आज आदिवासी विकासच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला विभागाने ताब्यात घेतले आहे. गेल्या 15 दिवसांपासून एसीबी बागूलच्या मागावर होते. सेंट्रल किचनच्या (Central Kitchen) कामासाठी 12 टक्के दराने लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.