Nashik News : नाशिकमध्ये भाजपाचा 'हिरा' ठाकरे गटात? मालेगावात पुन्हा भुसे विरुद्ध हिरे
Nashik News : मालेगाव तालुक्यातील डॉ. अद्वय हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Nashik News : नाशिकमधून (Nashik) भाजपला (BJP) जोरदार धक्का बसला असून भाजपचे मालेगाव तालुक्यातील शिलेदार डॉ. अद्वय हिरे (Dr. Advay Hiray) यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी त्यांनी आपल्या समर्थकांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे दिसून आले.
अद्वय हिरे नेतृत्वामुळे भाजपला बळकटी मिळालेली होती. पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना कट्टर व शक्तिशाली विरोधक म्हणूनही हिरे यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र महाआघाडी सरकार कोसळल्याने तसेच शिवसेना फुटल्यानंतर मालेगाव तालुक्यात भाजप व मूळ सेनेतील दुरावा संपला होता. हे राजकीय समीकरण ज्या पद्धतीने भाजप हिताचे नव्हते. त्याचप्रमाणे शहर तालुक्यातील ही जनाधार प्राप्त भाजप नेत्यांच्या राजकीय मुळावर उठणारे होते. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी मालेगाव येथे मोठे आंदोलन झाले, या संदर्भात अद्वय हिरे यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कळवले होते. मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष करण्यात आले. त्याचबरोबर पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन प्रकल्प उभारण्याचे ठरविले होते.
याच पार्श्वभूमीवर भाजपाला स्थान कमी होत असल्याने अद्वय हिरे यांनी गेल्या आठवड्यात हिरे यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची मुंबईत घेतलेली भेट चर्चेत आली होती. त्यानंतर आता त्यांनी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लवकरच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी काळात दादा भुसे विरुद्ध हिरे असा सामना पाहायला मिळण्याची शकयता आहे.
आता ठाकरे छावणीत
आगामी काळात अनेक निवडणूक आहेत, त्यातच पाटील यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केल्याने झाले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत पाटील यांना भाजपकडून तिकीट मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. दुसरे म्हणजे भुसे यांची हकालपट्टी करण्यासाठी पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पत्रही लिहले आहोत. परंतु मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे टाहाकारी गटात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले. डॉ. हिरे आता ठाकरे छावणीत गेल्याने, महत्त्वाच्या निवडणुकांपूर्वी मालेगाव आणि लगतच्या ग्रामपंचायतींमध्ये राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
पालकमंत्री पदावरून हकालपट्टी करा...
काही दिवसांपूर्वी मालेगाव परिसरात शेतकऱ्यांकडून मोठे जण आंदोलन उभारण्यात आले होते. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने बोरी-आंबेदारी धरण पाईपलाईन प्रकल्पाबाबत शिंदे-फडणवीस सरकारच्या 'निष्क्रियता'वर मालेगावमधील भाजपचे उदयोन्मुख नेते म्हणून पाहिले जाणारे पाटील हे नाराज आहेत. 3 डिसेंबर 2022 रोजी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. मात्र त्यावरही फडणवीस यांनी काहीही उत्तर दिले नव्हते. दरम्यान आंदोलनातील असंख्य शेतकऱ्यांच्या शवावरून हि पाईपलाईन जावू देणार नाही असा निर्धार तालुक्यातील जनतेने केला होता. त्यामुळेच दादा भुसे यांची मंत्री पदावरुन तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली.
शिंदे गट आल्यापासून....
गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. मालेगावात झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भाजप आणि शिंदे गटाने कुठेही दखल घेतली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमधला रोष वाढत होता. भाजपच्या वरिष्ठ सर्व नेत्यांच्या कानावर इथली परिस्थिती टाकून देखील त्याचा कुठलाही परिणाम मात्र झाला नाही. शिंदे गट आल्यापासून भाजपाच्या कार्यकर्त्यांना विशेष स्थान मालेगावात राहिले नाही. सातत्याने भाजपच्या कार्यकर्त्यांची कुचंबना होत होती. त्यामुळे आज कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सोडचिठ्ठीचा निर्णय घेतल्याचे अद्वय हिरे पाटील यांनी सांगितले.