एक्स्प्लोर

Nashik Crime : तस्करांची कमाल! अवैध मद्य वाहतुकीच्या संरक्षणासाठी 'क्रेटा आणि स्विफ्ट कार', नाशिकमध्ये एक्साईजची कारवाई

Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) राज्य उत्पादन शुल्क विभागाची (State Excise Department) भलीमोठी कारवाई आलेली असून तब्बल नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

मद्य वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या संरक्षणार्थ 'क्रेटा आणि स्विफ्ट कार', नाशिकमध्ये एक्साईजची भलीमोठी कारवाई  

Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) राज्य उत्पादन शुल्क विभागाची (State Excise Department) भलीमोठी कारवाई आलेली असून तब्बल नऊ जणांना या कारवाईत अटक करण्यात आली आहे. तसेच मद्य वाहतूक (Liquor Transport) करणाऱ्या ट्रकच्या संरक्षणार्थ असलेल्या 'क्रेटा आणि स्विफ्ट कार' ही जप्त करण्यात आल्या आहेत. 

नाशिक जिल्ह्यातून (Nashik District) अवैध मद्यसाठ्याची वाहतूक करताना राज्य शुल्क विभागाने हि कारवाई केली आहे. सिन्नरच्या (Sinnar) मोहदरी घाटात (Mohdari Ghat) महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंध असलेला मद्यसाठा वाहतूक करणारा ट्रक अडवला. दरम्यान तपासणी केली असता या ट्रकमध्ये परराज्यात विक्रीसाठी परवानगी असलेला मद्यसाठा आढळून आला. अधिकारी ट्रकची तपासणी करताना लक्षात आले कि, ट्रकच्या सुरक्षेसाठी ट्रकच्या पुढे मागे दोन कारही तैनात करण्यात आल्या आहेत. या संरक्षण देणाऱ्या दोन कारही जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. 

राज्य शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, भरारी पथक एकचे निरीक्षक जयराम जाखरे यांना मद्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथक तयार केले. या कारवाईसाठी पथक तयार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार हे पथक सिन्नरच्या मोहदरी घाटात जाऊन थांबले. मोहदरी शिवारातील हॉटेल सूर्याच्या बाजूला वाहनांची तपासणी दरम्यान आयशर टेम्पोची संशयास्पद हालचाल दिसून आली. तातडीने पथकाने सदर आयशर टेम्पोची तपासणी केली असता गोवा राज्यात विक्रीसाठी परवानगी असलेल्या मद्यसाठा या ट्रकमध्ये आढळून आला. 

दरम्यान जप्त केलेल्या मद्यसाठ्यात ओल्ड बिल स्पेशल व्हिस्कीच्या ७५० मिलीच्या ३ हजार ६०० सिलबंद बाटल्या (३०० बॉक्स) आढळून आल्या. यासोबत ट्रकमधील आणि दोन्ही कारमधील नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. नरेंद्रसिंग ऊर्फ नरेश राजेंद्रसिंग रोतेला, नारायण भगवान गिरी, सुनील रामचंद्र कांबळे, अजय सूर्यकांत कवठणकर, रवींद्र दत्तात्रय काशेगावकर, जतिन गुरुदास गावडे, सतीश संतोष कळगुटकर, सुभाष सखाराम गोदडे व अशोक बाबासाहेब गाडे अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

सदरील घटनेची चौकशी करीत असताना, टेम्पोच्या संरक्षणार्थ क्रेटा कार ही मद्यवाहतूक करीत असलेल्या टेम्पोच्या पुढे आणि स्विफ्ट डिझायर कार ही पाठीमागे चालत होत्या. याअर्थी या दोन्ही वाहने मद्यवाहतूक करणाऱ्या वाहनाला संरक्षण देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पथकाने या कारवाईत अवैध मद्यसाठा, ट्रक, दोन कार असा ४० लाख २० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप, दक्षता पथकाचे संचालक सुनील चव्हाण, नाशिकचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक एकचे निरीक्षक जयराम जाखर, दुय्यम निरीक्षक जी. पी. साबळे, रोहीत केरीपाळे, यशपाल पाटील, जवान सुनील दिघोळे, धनराज पवार, राहुल पवार, राजकुमार चव्हाणके, अनिता भांड यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget