एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik News : आईसह दवाखान्यात जात होता, रस्त्यात भलतंच घडलं, चालत्या दुचाकीवर हृदयविकाराचा धक्का 

Nashik News : हल्ली तिशीच्या तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढले असून नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे.

Nashik Sinner News : हल्ली जिना चढत असताना, चालताना, एखादे काम करताना हृदयविकाराच्या (Heart Attack) धक्क्याने निधन  झाल्याच्या घटना घडत आहेत. असाच एक प्रकार नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात घडला आहे. तालुक्यातील सोनांबे येथील 30 वर्षीय तरुणाच्या (Youth Died) पोटात दुखू लागल्याने दवाखान्यात नेत असताना दुचाकीवरच हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 

अलीकडे धावपळीचं जगणं झाल्याने कुठे कधी मृत्यू ओढवेल हे सांगता येत नाही. हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चालता चालता, डान्स करताना, वाहन चालवताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशीच एक घटना सिन्नर (Sinnar) येथील तरुणासोबत घडली आहे. या तरुणास पोटदुखीचा त्रास होता.  नातेवाईक दुचाकीवर दवाखान्यात घेऊन जात असताना अचानक तरुणास हृदयविकाराचा झटका आला अन् प्राण गमवावे लागले. सिन्नर तालुक्यातील सोनांबे येथील रहिवासी असून अमोल प्रकाश शिरसाठ असे या तरूणाचे नाव आहे. 

सोनांबे येथे राहणारा अमोलला अचानक अस्वस्थ वाटू लागले. सायंकाळी  अचानक अमोलच्या पोटात दुखू लागले. ही बाब त्याने आपल्या घरच्यांना सांगितल्यानंतर काका व आई त्याला उपचारासाठी घेऊन दुचाकीवरून सिन्नरकडे येत होते. दुचाकीवर काका व आईच्या मधोमध अमोल बसला होता. घोटी महामार्गावरील बंधन लॉन्सजवळ आल्यावर त्याला हृदयविकाराचा झटका आला. काही वेळातच त्याने अंग सोडून दिले. पाठीमागे बसलेल्या आईने कसेबसे त्याला पकडून ठेवत सिन्नरमधील खाजगी रुग्णालयात घेऊन आले. मात्र, डॉक्टरांनी त्यास तपासल्यावर मृत घोषित केले. काल रात्री 8.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पोटात दुखत असल्याने अमोलला कुटुंबीय दवाखान्यात नेट असताना क्षणार्धात दुर्दैवी घटना घडली. काका व आईने अमोलला त्याच स्थितीत दवाखान्यात नेले. खासगी डॉक्टरांनी तपासणी करत त्याचे निधन झाल्याचे सांगितले. अमोल हा आईसोबत सोनांबे गावात राहत होता, तर माळेगाव येथील एका कारखान्यात तो नोकरीला होता. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली असून मित्र परिवारासह तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सिन्नरच्या शिक्षकाचा मृत्यू 

काही दिवसांपूर्वी सिन्नर येथील शिक्षकाचा पर्यवेक्षण करताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सिन्नर येथील महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयात इयत्ता दहावीच्या पेपरचे पर्यवेक्षण करत असताना किरण भास्कर गवळी या शिक्षकांचा मृत्यू झाला होता. हे शिक्षक इंग्रजीच्या पेपरची तयारी करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यावेळी ते जमिनीवर कोसळले हे पाहून शाळेतील शिक्षकांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र तोपर्यत त्यांचा मृत्यू झाला होता. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRam Shinde Full PC : माझा पराभव हा नियोजित कट, त्यात अजित पवार सहभागी; राम शिंदेंचा आरोपCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Ajit Pawar Rohit Pawar meet : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
Embed widget