(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : धक्कादायक! दहावीच्या पेपरची तयारी सुरु होती, शिक्षक जमिनीवर कोसळले, विद्यार्थ्यांचा हंबरडा!
Nashik News : धक्कादायक! दहावीच्या पेपरची तयारी सुरु होती, अशातच शिक्षक जमिनीवर कोसळले...
Nashik News : सध्या राज्यभरात दहावी (SSC EXam) आणि बारावीच्या परीक्षा (HSC Exam) सुरु आहेत. अशातच नाशिक जिल्ह्यतील सिन्नर (Sinnar City) शहरात परीक्षा केंद्रावर धक्कादायक घटना घडली आहे. पेपर सुरु होण्यापूर्वी तयारी सुरु असताना अचानक पर्यवेक्षण करणाऱ्या शिक्षकाचा (Teacher Death) हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. यामुळे शाळा परिसरासह मित्र परिवार आणि कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा मार्च रोजी इंग्रजीचा पेपर (English Paper) होता. यासाठी सिन्नर येथील महात्मा फुले विद्यालयात तयारी सुरु होती. या संदर्भातील सहकारी शिक्षक वर्गात सुरु होते. याच ठिकाणी शिक्षक किरण भास्करराव गवळी (Kiran Gawali) हे देखील पर्यवेक्षणासाठी होते. नियोजन सुरु असताना अचानक गवळी याना हृदय विकाराचा झटका आला. ते चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने शाळेतील शिक्षकांनी त्यांना तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले.
किरण भास्करराव गवळी असे मृत शिक्षकाचे नाव आहे. गवळी हे सिन्नर शहरातील महात्मा ज्योतीराव फुले विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते. सहा मार्च रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा पेपर होता. यावेळी गवळी हे सहकाऱ्यांसह पेपरची तयारी करत होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली पडले आणि बेशुद्ध झाले. शाळेतील शिक्षकांनी त्यांना तात्काळ शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्यांचे हृदय बंद पडल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. किरण गवळी यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक रामदास धुमाळ करत आहेत.
गवळी सर म्हणून प्रसिद्ध...
किरण गवळी हे सिन्नर शहरात वास्तव्यास होते. ते शहरातील महात्मा ज्योतीराव फुले शाळेत शिक्षक म्हणून काम करत होते. सुरुवातीला ते मेकॅनिकल अभियंता म्हणून काम करत होते. मात्र गेल्या पंचवीस वर्षांपासून ते प्राध्यापक म्हणून या शिक्षण संस्थेत कार्यरत होते. गवळी यांचा दांडगा जनसंपर्क, मोठा मित्रपरिवार होता आणि विद्यार्थ्यांमध्ये गवळी सर म्हणून ते प्रसिद्ध होते. अनेक होतकरु विद्यार्थ्यांना ते नेहमीच मदत करत असत. त्याचबरोबर ते उत्तम वक्ता, प्रकल्प व्यवस्थापक म्हणून त्यांनी कामही केले होते. संस्थेच्या विविध कार्यक्रमांमध्ये नेहमीच अग्रभागी असायचे. किरण गवळी यांनी नुकतीच पन्नाशी ओलांडली होती. त्या निमित्त सर्व वर्गमित्रांचे गेट-टुगेदर देखील सिन्नर येथे पार पडले होते.