(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Ganeshotsav : 'गणपती बाप्पा मोरया', नाशिकमध्ये मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात!
Nashik Ganeshotsav : नाशिकमध्ये (Nashik) बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीला (Ganesh Immersion) सुरवात झाली आहे.
Nashik Ganeshotsav : अखेर दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर (Ganeshotsav) नाशिकमध्ये (Nashik) बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीला (Ganesh Immersion) सुरवात झाली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी मिरवणुकीचा शुभारंभ गणरायाची आरती करून केला आहे. नाशिक शहरातील नेहमीच्या वाकडी बारवी येथून निघणाऱ्या मिरवणुकीला मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या हस्ते आरती करून सुरुवात करण्यात आली. यावेळी सुरुवातीला नाशिक महानगरपालिकेच्या गणपती बाप्पाला मिरवणुकीच्या अग्रभागी असून त्यानंतर नाशिक शहरातील मानाचा पहिला गणपती रविवार कारंजा मंडळाच्या चांदीच्या गणपतीचा रथ सहभागी झाला आहे.
दोन वर्षांच्या कालावधीनंतर बाप्पाचे दिमाखात आगमन झाले. त्यानंतर दहा दिवसांच्या आनंदायक वातावरणात बाप्पाचा सोहळा पार पडला. मागील दहा दिवसांपासून घरोघरी, सार्वजनिक मंडळात गणेशाचे नाशिकरांनी दर्शन घेतले. मात्र आज बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात येत आहे. नाशिकच्या वाकडी बारव परिसरातून मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला असून मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मिरवणुकीला शुभारंभ झाला आहे. सुरवातीला महानगरपालिकेच्या बाप्पाची आरती करून मिरवणुकीला सुरवात झाली.
शहरात पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात महापालिकेचे गणपतीची मिरवणूक सुरू करण्यात आली. दरम्यान मुख्य मिरवणुकीला सुरुवातीला सुरवात झाली असून नाशिक महानगरपालिकेच्या गणपती बाप्पारथ मिरवणुकीच्या अग्रभागी आहे. तसेच त्यानंतर नाशिक शहरातील मानाचा पहिला गणपती रविवार कारंजा मंडळाचा चांदीच्या गणपतीचा रथ सहभागी झाला आहे. या ठिकाणी सुद्धा सहस्रानंद वाद्य वाजविण्यात येत असून अनेक ढोलपथकांचा समावेश यात करण्यात आला आहे. नामदार गिरीश महाजन यांनी सांगितले की नाशिक शहरात काल मुसळधार पाऊस झाला असल्याने हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजही पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
गिरीश महाजन म्हणाले....
नामदार गिरीश महाजन यांनी सांगितले की नाशिक शहरात काल मुसळधार पाऊस झाला असल्याने हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजही पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणूक लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्यांनी केले त्याचबरोबर यापूर्वी दहीहंडी गणेशोत्सव या काळात काही कार्यकर्त्यांना गुन्हे दाखल करण्यात आले होते ते सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक शहरातील श्री गणेश मिरवणूक अत्यंत उत्साहात साजरी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पावसाची उसंत, नाशिकमध्ये भाविकांचा उत्साह
दरम्यान नाशिक शहर परिसरात काल सायंकाळपासून सुरु झालेल्या पाऊस मध्यरात्रीपर्यंत होता. त्यामुळे शहर परिसरात पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे नाशिककरांचे देखावे पाहण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले. मात्र आज सकाळपासून पावसाने उघडिप दिली असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे. मिरवणुकीला सुरवात झाली असून हजारो नागरिक मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. मात्र आजही पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीवर पावसाचे सावट आहे. त्यामुळे मिरवणुका लवकरात लवकर आटोपण्याचे आवाहन करण्यात आले आहे.