Nashik Shiwai Bus : नाशिकमध्ये 'शिवाई'चा टॉप गिअर कधी? चार्जिंग स्टेशनचे कामही संथगतीने
Nashik Shiwai Bus : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील शिवाई (shiwai Bus) आधुनिक इलेक्ट्रिक बसचा (Electric Bus) शुभारंभ पुण्यात झाला असला तरी नाशिककरांना (Nashik) मात्र शिवाईची प्रतीक्षा आहे.

Nashik Shiwai Bus : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील शिवाई या आधुनिक इलेक्ट्रिक बसचा शुभारंभ पुण्यात झाला असला तरी नाशिककरांना मात्र शिवाईची प्रतीक्षा आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने शिवाई या इलेक्ट्रिक बसची सुरवात केली. त्यानंतर राज्यभरात टप्प्याटप्प्याने हि सेवा देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यात पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक दाखल झाल्या असून महाराष्ट्राची जीवनवाहिनी असे ब्रीदवाक्य घेऊन मिरवणारी लालपरी अर्थात एसटीच्या अमृतमहोत्सवी दिनी या शिवाजी बसचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यानंतर पहिली शिवाई बस पुणे ते अहमदनगर या मार्गावर मार्गस्थ झाली. त्यानंतर आता राज्यातील महत्त्वाच्या शहरात सेवा पुरवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे.
दरम्यान 01 जून 1948 रोजी पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर महामंडळाची एसटी बस धावली होती. या घटनेच्या सन्मानार्थ एसटी महामंडळाच्या वतीने दरवर्षी एक जून रोजी एसटीचा वर्धापन दिन साजरा केला जातो. यंदा आपणही भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक बस शिवाइचा शुभारंभ करण्यात आला आहे. त्यानंतर आता ही शिवाइ बस नाशिकसह कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद या जिल्ह्यातही धावणार आहे. या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी पन्नास बसेस देण्यात येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानुसार नाशिक शहरात 4 बसेसने शुभारंभ केला जाणार असल्याचे समजते. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा नसल्याने नाशिककरांना किती काळ वाट पहावी लागणार हे सांगणे थोडे अवघडच आहे.
पुणे अहमदनगरसह आणखी काही मार्गांवर शिवाई बससेवा सुरु झाली असली तरी नाशिकमध्ये अद्याप या बसेसची प्रतीक्षा आहे. चार्जिंग स्टेशन्स सज्ज होत नाही तोपर्यंत हि बससेवा सुरु होऊ शकत नसल्याचे महामंडळातील सूत्रांचे मत आहे. त्यामुळे नाशिकला अजून किती काळ शिवाई ची वाट पाहावी लागणार हे सांगणे कठीण आहे.
नाशिकमध्ये चार्जिंग स्टेशन काम सुरु
नाशिकमध्ये शिवाई बस येईल तेव्हा येईल मात्र महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून चार्जिंग स्टेशन बसविण्याचे काम सुरु आहे. या कामासाठी जवळपास पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजूनही महिण ते दीड महिना शिवाईची प्रतीक्षा नाशिककरांना करावी लागणार आहे. सध्या हाय टेंशन (एचटी) कनेक्शनच्या भूमिगत केबल टाकण्याचे काम महावितरणकडून सुरू आहे.
अद्याप अधिकृत काहीच नाही
दरम्यान शिवाईची बससेवा सुरु झाल्यानंतर राज्यातील महत्वाच्या शहरांना या बसची प्रतीक्षा आहे. त्यामध्ये नाशिकचा देखील समावेश आहे. सुरवातीला नाशिकला ५० बसेस येणार अशी माहिती समोर आली होती. मात्र अद्यापही याबाबत अधिकृत घोषणा किंवा पात्र आले नसल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे नाशिककरांना अजून एक ते दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
