Nashik Rain : गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, मंदिरे पाण्याखाली
Nashik Rain : नाशिकच्या (Nashik) गंगापूर धरणातून (Gangapur Dam) 9 हजार क्युसेकने (Water Discharged) गोदावरीच्या पात्रात विसर्ग सुरू झाला आहे.
Nashik Rain : गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं हजेरी लावल्याने गंगापूर धरणातून 9 हजार क्युसेकने (Water Discharged) गोदावरीच्या पात्रात विसर्ग सुरू झाला आहे. याच विसर्गामुळे गोदावरीच्या (Godavari) पाणी पातळीत पुराची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या मारुतीच्या छातीपर्यंत सध्या पाणी आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान काल सकाळपासून नाशिक (Nashik) शहरासह जिल्हाभरामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे. काल रात्रीपासून जिल्ह्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. तर नाशिक शहरांमध्ये देखील संततधार सुरू असल्याने गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे येथील पातालेश्वर मंदिर असेल किंवा इतर गंगा गोदावरी मंदिर असतील इतर सर्व मंदिरे ही पाण्याखाली गेलेली आहेत. काल टप्प्याटप्प्याने म्हणजे पहिले 1000 क्युसेकने विसर्ग करण्यात आला. त्यानंतर सकाळी दहा वाजता 5 हजार क्युसेकने विसर्ग करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी रात्रीपर्यंत हा 7000 क्युसिक वेगाने विसर्ग हा सुरू आहे.
परंतु अजूनही त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) आणि गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस चालू आहे. त्याचबरोबर इगतपुरीमध्ये देखील पाऊस चालू आहेत. नाशिक जिल्ह्यातील इतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पालखेड धरण, मुकणे धरण परिसरात सर्व ठिकाणी पावसाचा जोर चालू आहे. त्यामुळे प्प्याटप्प्याने परिस्थिती बघून तिथला पाण्याचा विसर्ग हा देखील वाढवला जात आहे. त्यामुळे गोदावरीच्या नदीकाठी राहणार्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
सद्रयस्थितीत होळकर पुलाखाली म्हणजे गंगापूर धरणामध्ये पाण्याचा विसर्ग झाल्यानंतर नाशिक शहरांमध्ये इतर ठिकाणी जे पावसाचे पाणी पडत. हे टेकावर बसलेले शहर असल्याने पावसाचे पाणी उतरत उतरत गोदावरीच्या पात्रामध्ये येते. त्यामुळे इथला पाण्याचा वेग हा अधिक असतो. सध्या होळकर पुलाखालून 930 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहेत. त्यामुळे एकूणच नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढत असल्याने गंगापूर धरणातून 9000 क्युसिक वेगाने पाण्याचा विसर्ग चालू आहे.
सतर्कतेचा इशारा
एकूणच नाशिक जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पावसाचा जोर हा वाढत असल्यामुळे नागरिकांना सतत इशारा देण्यात आला आहे. गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने नदीकाठी कोणी जाऊ नये. त्याचबरोबर इथले जे व्यवसायिक आहे, त्यांना देखील इतरत्र स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गोदावरी काठावर जे धार्मिक विधी पार पडतात. ते देखील इतर ठिकाणी स्थलांतरित करण्यात आलेले आहे. त्यामुळे एकूणच आजचा दिवस महत्त्वाचा आहे तर अधिकाधिक पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार आहे.