Doctor Suicide : राज्यातला टॉपर विद्यार्थी, मात्र जळगावच्या तरुण डॉक्टरनं स्वतःला संपवलं, केईम हॉस्पिटलमधील घटना
Jalgaon Suicide : मुंबई येथे केईएम हॉस्पिटल येथे कार्यरत डॉक्टर तरुणाने ऑनड्युटी इंजेक्शन घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Jalgoan News : जळगाव (Jalgaon) शहरातील मूळच्या रहिवासी असलेल्या तसेच मुंबई येथे केईएम हॉस्पिटल (Mumbai KEM Hospital) येथे कार्यरत डॉक्टर तरुणाने ऑनड्युटी इंजेक्शन घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. आदिनाथ संजय पाटील (Dr. Adinath Patil) असे मयत डॉक्टर तरुणाचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरात आकाशवाणी चौक परिसरात फिजिशियन डॉ. संजय पाटील, डॉ. स्मिता पाटील हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. आदिनाथ हा त्यांचा मोठा मुलगा असून आदिनाथ हा मुंबईच्या केईएम हॉस्पिटल येथे गेल्या 6 वर्षांपासून पदवी व त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण घेत होता. त्याचा लहान भाऊ अजिंक्य हा देखील केईएम हॉस्पिटल येथे पदवीचे वैद्यकीय शिक्षण (Medical Education) घेत होता. आदिनाथ पाटील याची क्षयरोग विभागात ड्युटी होती. रविवारी रात्री 1 वाजेपर्यंत तो त्याच्या वरिष्ठ डॉक्टरांसह कामावर होता. हसतखेळत असताना त्याने ड्युटी पूर्ण केली. सोमवारी सकाळी रुग्णालयातील एक कर्मचारी हा नेहमीप्रमाणे कामावर आल्यावर ८ वाजेच्या सुमारास टीबी विभागाचा दरवाजा आतून बंद दिसला. त्यांनी उघडला असता, आदिनाथ हा बेशुद्धावस्थेत दिसून आला.
दरम्यान संबंधित कर्मचाऱ्याने याबाबत वरिष्ठांना कळविले. त्यानुसार तातडीने डॉ. आदिनाथ यांना तातडीने उपचारार्थ दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. त्याच्या हातावर तीन वेळा इंजेक्शन टोचलेले दिसून येत होते. त्यामुळे त्याने इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. संध्याकाळी पाच वाजता त्याचे शवविच्छेदन पूर्ण झाल्यावर मृतदेह जळगावकडे रवाना करण्यात आला आहे.
दरम्यान, आदिनाथ पाटील हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता. बारावीनंतर त्याने दिलेल्या नीट परीक्षेत तो राज्यातून दुसरा तर देशातून 84 वा आलेला होता. रुग्णालयातही तो हसमुख, मनमिळावू, हुशार, प्रामाणिक विद्यार्थी होता, अशी माहिती केईएम रुग्णालयाचे पदव्युत्तर विभागाचे उप अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांनी दिली आहे. आदिनाथच्या मृत्यूमुळे केईएमच्या विद्यार्थाना, शिक्षकांना तसेच पाटील परिवाराला धक्का बसला आहे. आदिनाथने अचानक टोकाचा निर्णय का घेतला, याबाबतचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. दरम्यान, याप्रकरणी मुंबईतील भोईवाडा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आलेली आहे. घटनेची माहिती वाऱ्यासारखी सर्वत्र पसरले या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यातील डॉक्टरांमध्ये सुद्धा मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा :