Pune Crime news : विहिरीतून चिमुकल्यांचे मृतदेह बाहेर काढले; बायको अन् दोन मुलांची हत्या करुन डॉक्टरने स्वत:ला का संपवलं? पोलीस म्हणतात...
विहिरीतील पाणी काढून त्या दोन चिमुकल्या बालकांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. डॉ. अतुल शिवाजी दिवेकर आणि त्यांच्या पत्नी पल्लवी अतुल दिवेकर यांचे मृतदेह ताब्यात घेतले होते आणि आज या दोन अदिवत अतुल दिवेकर आणि वेदांती अतुल दिवेकर बालकांचा मृतदेह ताब्यात घेतले.
Daund Crime news : पतीने पत्नीची हत्या करून दोन मुलांना विहिरीत टाकल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील (Daund Suicide Case) वरवंड येथे घडली. वरवंड येथील डॉक्टर असलेल्या अतुल दिवेकर यांनी शिक्षिका असलेल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर दोन मुलांना विहिरीत टाकून त्यांची हत्या केली आणि स्वतः घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केली होती. या दोन मुलांचा विहिरीत शोध सुरु होता. ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने विहिरीतील पाणी काढून त्या दोन चिमुकल्या बालकांचा मृतदेह बाहेर काढण्यात आले. डॉ. अतुल शिवाजी दिवेकर (वय 42) पल्लवी अतुल दिवेकर यांचे मृतदेह ताब्यात घेतले होते आणि आज या दोन अदिवत अतुल दिवेकर ( वय 9 ), वेदांती अतुल दिवेकर बालकांचा मृतदेह ताब्यात घेतले. सगळ्यांचे मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, नवरा बायकोचे छोट्या छोट्या गोष्टींवरुन वाद सुरु होते, अशी माहिती मिळाली. या कारणांमुळे त्याने हे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ते एक सुखवस्तू कुटूंब होतं. डॉ. अतुल शिवाजी दिवेकर जनावरांचे डाॅक्टर होते. त्यांची प्रॅक्टीस व्यवस्थित सुरु होती. काल ते फोन उचलत नव्हते. दरवाजा वाजवल्यावर प्रतिसाद देत नव्हते. त्यामुळे स्थानिकांनी पोलीस पाटलांना कळवलं. पोलीस पाटलांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला.
बायकोचा मृतदेह हॉलमध्ये, डॉक्टरचा बेडरुममध्ये
दरवाजा तोडल्यावर बायकोचा मृतदेह हाँलमध्ये होता आणि डॉ. अतुल शिवाजी दिवेकर यांचा मृतदेह बेडरुममध्ये गळफास घेऊन लटकलेला दिसला. बायकोचा गळा दोरीने आवळल्याचं दिसलं. त्यानंतर पोलिसांनी बाकी घराची पाहणी केली. ज्या ठिकाणी त्यांचा मृतदेह होता. त्याच बेडरुममध्ये बेडवर सुसाईड नोटदेखील पोलिसांना सापडली. मुलांना कोणत्या विहिरीत टाकलेलं आहे, असं सुसाईड नोटमध्ये लिहीलं होतं. त्यानुसार विहीरीतलं पाणी काढून टीमने शोधमोहिम राबवली. त्यानंतर काही तासांनी मुलांचे मृतदेह सापडले.
यवतमध्ये घटनेची चर्चा...
काल संध्याकाळी ही घटना उघडकीस आली होती. त्यानंतर पुणे जिल्हा हादरला. यवत गावात या घटनेमुळे शोकाकूल वातावरण निर्माण झालं आहे. डॉक्टरांनीच असं कृत्य केल्याने सगळीकडे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांनी या तिघांची हत्या करुन आत्महत्या का केली असावी, याचा शोध पोलीस घेत आहेत.
संबंधित बातमी-